शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पाणी पुरवठा योजना मुख्यमंत्र्यांच्या ‘कोर्टात’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 01:08 IST

खामगाव: स्थानिक वाढीव पाणी पुरवठा योजनेचे ‘ग्रहण’ दहा वर्षांनंतरही कायम आहे. ‘तांत्रिक’ अडचण आणि न्यायालयीन कचाट्यात सापडलेल्या या योजनेला तत्काळ मार्गी लावावे, तसेच प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, यासाठी खामगाव वाढीव पाणी पुरवठा योजना मुख्यमंत्र्यांच्या ‘कोर्टात’ पोहोचविण्यात आली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसंदर्भातील हालचालींकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत.

ठळक मुद्देतांत्रिक अडचणींसोबत न्यायालयीन प्रक्रियेचाही पेच कायम!

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक वाढीव पाणी पुरवठा योजनेचे ‘ग्रहण’ दहा वर्षांनंतरही कायम आहे. ‘तांत्रिक’ अडचण आणि न्यायालयीन कचाट्यात सापडलेल्या या योजनेला तत्काळ मार्गी लावावे, तसेच प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, यासाठी खामगाव वाढीव पाणी पुरवठा योजना मुख्यमंत्र्यांच्या ‘कोर्टात’ पोहोचविण्यात आली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनेसंदर्भातील हालचालींकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत. खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेला राज्य शासनाच्या ‘यूआयडीएसएसएमटी’ योजनेंतर्गत सन २००८-०९ मध्ये मंजुरी मिळाली;   मात्र सुरुवातीपासूनच वाढीव पाणी पुरवठा योजना वांद्यात सापडली आहे. दरम्यान, मंजुरी मिळाल्यानंतर दहा वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर देखील वाढीव पाणी पुरवठा योजना पुर्णत्वास आली नाही. खामगाव शहराची वाढीव पाणी पुरवठा योजना मार्गी लागावी, यासाठी गेल्या दीड वर्षांपासून राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे, उपाध्यक्ष संजय पुरवार तसेच पालिका पदाधिकाºयांसोबतच खामगाव नगरपालिका प्रशासनानेही वाढीव पाणी पुरवठा योजनेचा मुद्दा उचलून धरला आहे. दरम्यान, वाढीव पाणी पुरवठा योजनेसोबतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा योजना हस्तांतरणासाठीदेखील मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येत असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांनी अतिशय गंभीरतेने दखल घेतल्याचा सूत्रांचा दावा आहे.

तांत्रिक अडचणींमुळे गती मंदावली! वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राची जागा उशिराने ताब्यात मिळणे, वन विभाग, राष्ट्रीय महामार्ग, पाटबंधारे विभागाच्या आवश्यक परवानगी उशिराने प्राप्त झाल्याने वाढीव पाणी पुरवठा योजना विहित कालावधीत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे कंत्राटदार कंपनीने झालेल्या विलंबामुळे निर्माण झालेल्या दर फरकाची मागणी केली. निविदेतील अटीशर्तीनुसार दरवाढ देय नसल्याने तसेच नगरपालिका आणि कंत्राटदार यांच्या नियंत्रणाबाहेरील कारणाने पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले आहे. 

न्यायालयीन वाद शिगेला! वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या दरवाढीसंदर्भात पालिकेने शासनाकडे शिफारस केली आहे. या शिफारशीवरदेखील शासन स्तरावरून कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच तांत्रिक अडचणींमुळे कंत्राटदार कंपनी आणि नगरपालिका प्रशासनात न्यायालयीन वाद निर्माण झाला आहे. सन २०१४-१५ मध्ये निर्माण झालेला न्यायालयीन वाद सद्यस्थितीत ‘जैसे थे’  आहे.

४८ कोटींचा खर्च ‘पाण्यात’!खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्यापासून आतापर्यंत या योजनेवर तब्बल ४८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी अत्यावश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाचा विनियोग योग्यप्रकारे होत नसल्याचे चित्र या निमित्ताने दिसून येते.

पावणेचार कोटींचे व्याज!वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत पालिकेच्या खात्यातील जमा रकमेवर ३.७५ कोटी रुपयांचे व्याज पालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. सन २००६-०७ या वर्षातील सीएसआरप्रमाणे या योजनेसाठी दर निश्चिती करण्यात आली आहे. योजना लांबल्याने आजच्या आणि त्यावेळच्या बाजारभावात तफावत आली आहे. परिणामी, मागील दरानुसार कंत्राटदार काम करण्यास तयार नाही. त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा योजनेचा तिढा कायम असल्याचे दिसून येते.

मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाºयांना सूचना !वाढीव पाणी पुरवठा योजनेचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव पाणी पुरवठा योजनेसंदर्भातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांना दिल्या असल्याची माहिती समोर आली. वादाच्या भोवºयात सापडलेली ही योजना आणखी वादादित न करता मार्गी लावण्याच्या दिशेने प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :khamgaonखामगावWaterपाणी