लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील तापडीया नगर भागातील एका घरात चोरी झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली.तापडीया नगरातील विलाससिंह पवार हे गत आठ दिवसांपूर्वी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील मौल्यवान वस्तू आणि घरातील किंमती वस्तू चोरून नेल्या. पवार बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरात नेमकी किती रुपयांची चोरी झाली हे समजू शकली नाही. दुपारी ४.३० वाजता शहर पोलिस घटनास्थळी पोहोचले होते.
खामगाव : तापडीया नगरातील घर फोडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 16:54 IST