शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : ‘महिको’वर कारवाईसाठी कृषी अधिकार्‍यांचे पथक मलकापुरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:07 IST

खामगाव : महाराष्ट्र हायब्रिड सीड कंपनी (महिको) वरील गडांतर अद्याप संपलेले नसून दहा दिवसानंतर  सोमवारी, १८ डिसेंबर रोजी कृषी विभागाचे पथक मलकापूरात कारवाईसाठी दाखल झाले होते. फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने अधिकार्‍यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. 

ठळक मुद्देबोगस बियाणे प्रकरण रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : महाराष्ट्र हायब्रिड सीड कंपनी (महिको) वरील गडांतर अद्याप संपलेले नसून दहा दिवसानंतर  सोमवारी, १८ डिसेंबर रोजी कृषी विभागाचे पथक मलकापूरात कारवाईसाठी दाखल झाले होते. फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने अधिकार्‍यांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील नामांकित कंपनी असलेल्या महिकोमध्ये बोगस बियाणे साठवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून बुलडाणा पोलिसांनी ८ डिसेंबर रोजी रात्री ६ गोडाउन सील केले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईनंतर बी.टी. कपाशीचे नमुने तपासणीसाठी घेऊन येथील गोडाउन सील करण्यात आले होते. राज्यभरातील शेतकर्‍यांच्या शेतामधील बी.टी. कपाशीवर यावर्षी आलेल्या बोंडअळीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने प्रत्यक्ष शेतावर जावून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, बोंडअळीच्या प्रतीकारक्षम असणार्‍या कपाशीच्या पिकावर नेमके अचानक एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आलेल्या बोंडअळ्यांमुळे बियाण्यांमधील दोष तपासण्यासही सुरुवात केली आहे. धानोरा येथील महिको कंपनीतील बोगस बियाण्याची शहानिशा करण्यासाठी कृषी विभाग व बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी महिकोतील सर्वच गोडाउनमधील सर्व प्रकारच्या भाजीपाला बियाण्यांचीसुद्धा तपासणी  मागील दोन दिवसात केली आहे. त्यामुळे आता सर्व गोडाउनला सील लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान, रविवारी नांदुरा येथील मुख्यमंत्र्यांची सभा झाल्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे आज कृषी विभागाचे पथक मलकापुरात पुढील कारवाईसाठी दाखल झाले होते. दिवसभर फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु होती. त्यासाठी अधिकारी सोमवारी रात्री उशिरापर्यंत मलकापुरात ठाण मांडून होते. 

भाजीपाला बियाण्यांचीसुद्धा तपासणी नांदुरा तालुक्यातील धानोरा येथील महिको कंपनीमधील उत्पादन, प्रक्रिया व पॅकींग होणार्‍या भाजीपाला बियाण्यांसह इतर पिकांच्या बियाण्यांची तपासणी सुरू केली आहे व इतरही गोडाउनची झाडाझडती घेण्यात येत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गोडाउन सील करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही महिको कंपनीमधील बियाण्यांचे नमुने घेतले आहेत. याबाबत फौजदारी कारवाईच्या अनुषंगाने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे. - विजय मुखाडे, जिल्हा कृषी अधिकारी 

टॅग्स :khamgaonखामगाव