शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यात १९ हजार हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने बाधित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:44 IST

गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे खामगाव तालुक्यातील संपूर्ण कपाशीचा पेरा धोक्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. खामगाव तालुक्यात १९४३0 हेक्टरवर कपाशीची पेरा असून, संपूर्ण पेरणी क्षेत्रच बाधित असल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत समोर आल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसंपूर्ण पेरणी क्षेत्रच बाधित असल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत समोर५.५0 हजारांवर शेतकर्‍यांनी सादर केले अर्ज!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे खामगाव तालुक्यातील संपूर्ण कपाशीचा पेरा धोक्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. खामगाव तालुक्यात १९४३0 हेक्टरवर कपाशीची पेरा असून, संपूर्ण पेरणी क्षेत्रच बाधित असल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत समोर आल्याची माहिती आहे.खामगाव तालुक्यात कपाशीचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे या भागातील शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात कपाशीची लागवड केली होती. दरम्यान, पेरणीनंतर  साधारणपणे ९0 दिवसांनंतर आढळून येणार्‍या गुलाबी बोंडअळीने ऑगस्टमध्येच कपाशीवर हल्ला चढविला.  त्यामुळे खामगाव तालुक्यातील  कपाशीचा संपूर्ण पेराच धोक्यात आल्याचे कृषी विभागाच्या पाहणी दिसून आले आहे.  गुलाबी बोंडअळीचा कपाशीवरील प्रकोप वाढल्यानंतर कृषी विभागाच्यावतीने तातडीने कपाशीच्या शेतीच्या पाहणीस सुरुवात करण्यात आली. या पाहणीत  धोकादायक गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे संपूर्ण क्षेत्रच आर्थिक नुकसान पातळीत आढळून आले आहे. परिणामी, शेतकर्‍यांकडून कपाशी पिकाच्या झालेल्या हानीचे मूल्यमापन करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेला अनुसरून,  ‘नमुना-जी’मध्ये तक्रार अर्ज मागविण्यात येत आहेत.

५.५0 हजारांवर शेतकर्‍यांचे अर्ज!गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाची हानी झाल्याचे निर्दशनास आलेल्या हजारो शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर केले आहेत. कृषी कार्यालयात तक्रारींचा ओघ कायम असून, २८ नोव्हेंबरपर्यंत ३५३८ शेतकर्‍यांनी ‘नमुना-जी’नुसार तक्रार अर्ज सादर केले होते. दरम्यान, ७ डिसेंबरपर्यंत ैंयात आणखी दोन हजारांवर अर्जाची भर पडली असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

डिसेंबरपूर्वी कपाशी काढावी!कपाशीवर सर्वात धोकादायक असलेल्या रसशोषक गुलाबी बोंडअळीचा प्रकोप आढळून आला आहे. ही बोंडअळी ठिप्पक्यांच्या आणि हिरव्या बोंडअळीच्या तुलनेत अधिक धोकादायक आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी फरदळीपासून उत्पन्न न घेता, डिसेंबरपूर्वी कपाशी काढून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कमीत कमी नत्रयुक्त खतांचा वापर करण्याचा सल्लाही कृषी विभागाकडून दिल्या जात आहे.

तालुक्यातील १९३४0 हेक्टरवरील कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावाची पाहणी कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांच्या तक्रारीही कार्यालयात स्वीकारण्यात येत आहे.- एस.एस. ढाकणे,तालुका कृषी अधिकारी, खामगाव.- 

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय