शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

खामगावात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:56 AM

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहरातील विकास कामांसाठी आलेल्या तब्बल अडीच कोटी रुपयांच्या निधीला ह्यब्रेकह्ण लावण्यात नगर पालिकेतील विरोधी ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील विकास कामांसाठी आलेल्या तब्बल अडीच कोटी रुपयांच्या निधीला ह्यब्रेकह्ण लावण्यात नगर पालिकेतील विरोधी सदस्य यशस्वी झाले. नगरोत्थानच्या निधीला अचानक ब्रेक लागल्याने नगर पालिकेतील सत्ताधारी हतबल झाल्याचे चित्र आहे.राज्यात असलेल्या आघाडी सत्तेचा दुरूपयोग करून शहरातील विकास थांबविल्यांची ओरड पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. त्याचवेळी शहरातील विकास कामे नव्हे, सत्ताधाऱ्यांच्या दूजाभावाला ब्रेक लावून अनियमितता थांबविल्याचा पलटवार विरोधी सदस्यांकडून केला जात आहे.खामगाव नगर पालिकेसाठी नगरोत्थान अभियानांतर्गत कामे वाटताना विरोधी नगरसेवकांना डावलण्यात आल्याचा आरोप नगर पालिकेच्या विरोधी सदस्यांनी केला. इतकेच नव्हे तर या कामांविरोधात जिल्हाधिकाºयांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवेंद्रदादा देशमुख यांच्या पुढाकारातून तक्रार करण्यात आली. देवेंद्र देशमुखांच्या तक्रारीला काँग्रेस गटनेते अमेय सानंदा, माजी नगराध्यक्ष सरस्वती खासणे आणि भारिप बहुजन महासंघाचे विजय वानखडे यांची साथ मिळाली. त्याचवेळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांनीही देवेंद्र देशमुखांच्या  तक्रारीला बळ दिले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी!नगरोत्थांच्या विषयांकित कामांची निविदा थांबविण्यात आल्यानंतर खामगाव पालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावरील सत्ताकेंद्रांमध्ये जुंपल्याचे प्रथमदर्शनी चित्र पालिकेतील नजीकच्या घडामोडीवरून दिसून येतो.तक्रारीत अनियमितेवर ठेवले बोट!  नगरोत्थान अभियानांतर्गत नगर परिषदेमधील सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर सत्ताधा-यांच्याच प्रभागात विकासकामे घेतली. तसेच प्रस्तावित सर्व विकासकामांचे अंदाजपत्रक हे अव्वाच्या सव्वा दराने तयार करण्यात आले. अनेक ठिकाणी नाल्या चांगल्या स्थितीत असतानाही, परत त्या ठिकाणी नवीन नाली बांधकाम प्रस्तावित केल्याचेही तक्रारीत नमूद केले. तर एका प्रभागात ८५ लक्ष रुपयांचे फक्त पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाला मान्यता देण्यात आलेली आहे.  वास्तविक पाहता ज्या ठिकाणी पेहर ब्लॉक बसविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी नगर परिषद निधीतून नुकतेच रस्त्याचे डांबरीकरण व काही ठिकाणी रस्त्याचे कॉंक्रिंटीकरण सुध्दा करण्यात आलेले आहे. अशा ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे म्हणजे शासनाच्या निधीच्या अपव्यय करण्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आल्याने या संपूर्ण प्रकाराची चौकशी आरंभण्यात आली असून सदर चौकशी पूर्ण होईपर्यंत विषयांकित कामांची निविदा थांबविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी मुख्याधिकाºयांना दिलेत.राजकारण्यांची कुरघोडी; अधिकारी कोंडीत!खामगाव शहरातील राजकारणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असते. फुंडकर आणि सानंदा या दोन राजकीय घराण्याचे विळ्या-भोपळ्याचे सख्य संपूर्ण जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. मात्र, आता खामगाव पालिकेतील सत्ता केंद्राला देवेंद्र देशमुखांनी धक्का दिला. त्यामुळे ऐन कोरोना काळात नगर पालिकेत एकच खळबळ उडाली. या राजकीय कुरघोडीत जिल्हास्तरीय आणि पालिका स्तरीय अधिकारी चांगलेच कोंडीत सापडल्याचे दिसून येते.

टॅग्स :khamgaonखामगावPoliticsराजकारण