शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव:विनाकारण फिरणाऱ्या ९३२ जणांवर दंडात्मक कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 14:56 IST

७२ जणांविरोधात कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना संचारबंदी काळात विनाकारण दुचाकीने फिरणाºया ९३२ जणांवर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. तर ७२ जणांविरोधात कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे शहरातील गर्दी नियंत्रणात आणण्यात पोलिस प्रशासनाला यश आले.बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात २१ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत बाहेरगावच्या नागरिकांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिस प्रशासनाकडून दुचाकी वाहने वापरण्यास  मनाई करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील शहरात दुचाकींचा वापर थांबत नसल्याचे निदर्शनास येताच शहर पोलिसांनी संबधितांवर कारवाई सुरू केली. यामध्ये दररोज सरासरी ३०-३५ कारवाई करण्यात आल्या. गुरूवार १६ एप्रिल रोजी   ५४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर शुक्रवार १७ एप्रिल रोजी ६३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत शहर पोलिस ९३२ जणांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे विनाकारण बाहेर फिरणाºयांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. ७२ जणांविरोधात गुन्हा दाखल!संचारबंदी काळात दुचाकीवर विनाकारण फिरणाºया डबलसीट धारकांना पोलिसांनी चांगलेच धारेवर धरले. या कारवाई दरम्यान ७२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अनेकांना दंडुक्याचा प्रसाद देण्यात आला. काही दुचाकी धारकांना उठबशांचीही शिक्षा देण्यात आली. बँकासमोर गर्दी करणाºयांना अनेकांना पोलिसांनी वठणीवर आणले. शहर पोलिस निरिक्षकांची अशीही संवेदनशीलता!शुक्रवारी कारवाई दरम्यान कंझारा येथील एका शेतकºयाला शहर पोलिसांनी पकडले. त्याला शहर पोलिस स्टेशनच्या आवारात बसविले. प्रत्येकाची चौकशी सुरू असताना, पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्याकडे या शेतकºयाने आपली व्यथा मांडली. शेतकºयांने सांगितलेल्या हकीकतीची शहनिशा केल्यानंतर शहर पोलिस निरिक्षक अंबुलकर यांनी त्याला कोणतीही कारवाई न करता सोडून दिले. इतकेच नव्हे तर स्वत:च्या खिशातून मदत देत, त्याला आधार दिला. मुलाच्या औषधीसाठी हा शेतकरी शहरात भाजी विक्रीसाठी आला होता. हे येथे उल्लेखनिय!

 संचारबंदी काळात दुचाकी, तिनचाकी वाहनांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाºयांनी तशा सूचना दिल्या आहेत. नियमांचे पालन न करणाºया विरोधात शहर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये.- सुनिल अंबुलकरपोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावtraffic policeवाहतूक पोलीस