शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

गरजूंच्या रोजगारांसाठी ‘पोलीसदादा’ची हाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 11:17 IST

Khamgaon News समाजाची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी बेरोजगार हाताला ‘रोजगार’ देण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतला आहे. 

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत नोकरी गमविलेल्यांना रोजगार देण्यासाठी खामगाव पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. कोरोना कालावधीत नोकरी गेलेल्यांसोबतच बेरोजगार असलेल्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी ‘एक रोजगार गरजुंसाठी’ हा उपक्रम पोलीस प्रशासनाच्यावतीने राबविण्यास सुरूवात केली आहे. अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या संकल्पनेतून सुरूवात करण्यात आलेल्या या उपक्रमाला खामगाव शहरातील अनेक सृजनशील आणि संवेदनशील व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, काही बेरोजगारांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमले आहे. हाताला काम देण्यासाठी पोलीस दादांच्या या उपक्रमाने शहरात बाळसे धरले असले तरी, सामाजिक संवेदनशीलतेमुळे पोलीसांचा हा उपक्रम अल्पावधीतच समाजमनाला भावला आहे. शहरी भागातील बेरोजगार आणि नोकरी गमावलेल्यांना यामुळे लाभ होणार आहे. हा उपक्रम ग्रामीण भागातही राबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कोरोना काळात रोजगार गेल्यामुळे अनेकांनी व्यवसाय बदलले आहेत. काही आॅटोचालक भाजी व्यवसायात गुंतले होते. तर उद्योग बंद पडल्याने तसेच अनेकांना नोकरीवरून कमी करण्यात आल्याने सामाजिक समतोल बिघडला आहे. अशा परिस्थितीत समाजाची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी बेरोजगार हाताला ‘रोजगार’ देण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतला आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. या उपक्रमासंदर्भात यासाठी २५ हजार पत्रके वितरीत करीत जनजागृती करण्यात येत आहे.

व्यावसायिकांकडून प्रतिसाद!खामगाव शहरातील वाढत्या चोऱ्या आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसी कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. मात्र, कॅमेरे बसवून समस्या सुटणार नाही, हे निदर्शनास येताच शहरातील बेरोजगारांना काम देण्यासाठीही पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. रोजगार मिळाल्याने अनेकजण गुन्हेगारीपासून परावृत्त होतील,अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

‘एक कॅमेरा शहरासाठी, एक रोजगार गरजुसाठी’ आणि ‘नो मास्क नो बिझनेस’ अशा दोन नवीन संकल्पना खामगाव येथे राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाला खामगाव शहरातील व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न आहेत.- हेमराजसिंह  राजपूत अपर पोलीस अधिक्षक, खामगाव.

शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून दोन नवीन उपक्रम राबविण्यास सुरूवात करण्यात आली. शहर पोलीस स्टेशनला बैठकही घेण्यात आली. बेरोजगारांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यास अनेक व्यावसायिकांनी अनुकुलता दर्शविली.- सुनील अंबुलकरशहर पोलीस निरिक्षक, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिस