शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खामगाव पोलिसांची धावपळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 15:03 IST

खामगाव: शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी गुरूवारी सकाळी शहर पोलिसांनी अतिक्रमक आणि काही बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली. मात्र, कारवाई होऊन काही वेळ उलटत नाही, तोच शहरातील परिस्थिती पूर्ववत झाली.खामगाव शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला गत आठमहिन्यांपासून सुरूवात झाली आहे. सुरूवातीला रस्त्याच्या दुतर्फा नालीचे बांधकाम करण्यात आल्यानंतर आता रस्ताकामाला कंत्राटदाराकडून सुरूवात करण्यात आली. ऐन गर्दीच्या वेळेत कंत्राटदाकडून खोदकाम करण्यात येत असल्यामुळे बस स्थानक चौक ते टॉवर चौक, टॉवर चौक ते जलंब नाका आणि जलंब नाका ते सुटाळा पर्यंत वाहतुकीची चांगलीच कोंडी होत आहे. परिणामी, शालेय विद्यार्थी आणि वाहन धारकांना कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई!शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले गुरूवारी सकाळी स्वत: रस्त्यावर उतरले. शहर पोलिस स्टेशन ते बस स्थानकापर्यंत रस्त्यावर उभी असलेल्या अनेक वाहनधारकांवर त्यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलिस आणि शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली. यावेळी दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी वाहनांची हवा सोडण्यात आली. 

रस्त्यावरील अतिक्रमणही केले मोकळे!पोलिस कारवाई दरम्यान, नांदुरा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद कॉम्पलेक्स स समोर काही अतिक्रमकांवर कारवाई करण्यात आली. विविध दुकाने आणि स्टॉल लावण्यासाठी करण्यात आलेले कच्चे अतिक्रमण तोडण्यात आले. मात्र, पोलिस कारवाईच्या काही वेळानंतर पुन्हा शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी जैसे थे झाली. अपघात टाळण्यासाठी नियमित कारवाई व्हावी!रस्ता विस्तारीकरणात एकाबाजूने रस्ता खोदण्यात आला. तर दुसºया बाजूने विविध दुकाने आहेत. या दुकानांच्या समोर मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि वाहने उभी राहतात. त्यामुळे रस्ता अरूंद झाला असून या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी नियमित पोलिस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी