शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

खामगाव: आरओ प्लांटधारकांना नोटिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 15:44 IST

Khamgaon News खामगाव नगर परिषदेने शहरातील २७ आरअेा प्लांट संचालकांना नोटिस बजावली.

लाेकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशानंतर उशिराने का होईना खामगाव नगर परिषदेने शहरातील २७ आरअेा प्लांट संचालकांना नोटिस बजावली. सोबतच काही प्रभागातील आरअेा  प्लांटची माहिती अद्याप न मिळाल्याने त्त्यांनाही दोन दिवसात नोटीस दिली जाईल.जिल्ह्यातील नगर पालिकांनी आरअेा प्लांटच्या विविध परवानग्यांची तपासणी करून सील करण्याची कारवाई सुरू केली. त्याबाबचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर  खामगाव पालिकेच्या करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये शहरातील १६ प्रभागातील २४ कर्मचाऱ्यांकडून माहिती प्राप्त झाली. काही जणांनी अद्याप माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांना नोटिस बजावता आली नाही. गुरूवारपर्यंत २७ आरअेा प्लांट संचालकांना नोटिस देण्यात आल्याची माहिती आहे.  प्रदुषण नियंत्रण मंडळाने हरित लवादाच्या आदेशानुसार निर्देशाचे पत्र दिले आहे. त्यामध्ये आरअेा प्लांट, पाणी शितकरण युनिट, तसेच त्याची बरणी किंवा कँनमधून विक्री करण्यासाठी परवानगी, तसेच जार किंवा कँनच्या माध्यमातून खुल्या पद्धतीने केली जाणारी विक्री मानवी आरोग्यास धोकादायक आहे. त्यावर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी लवादाच्या निर्देशानुसार चौकशी करावी, तसेच निकषानुसार सुरू नसलेल्या प्लांटवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिकेने आता नोटिस दिली. त्यामध्ये केंद्रीय भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेची परवानगी, पाण्याची गुणवत्ता प्रमाणित करणाऱ्या यंत्रणेचे प्रमाणपत्र, व्यवसायासाठी लागणाऱ्या इतर परवानग्या, नाहरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे सांगितले आहे. मुदतीनंतर ही कागदपत्रे सादर न  केल्ल्यास प्लांट सील करणार आहे.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा