शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पालिका सज्ज; आठ दक्षता पथके गठीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:25 IST

मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी नगर पालिकेतील विविध विभागातील कर्मचाºयांचा समावेश असलेली आठ दक्षता पथकं तैनात केली आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खामगाव नगर पालिकेने आठ दक्षता पथके गठीत केली आहे. या पथकांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक हालचाल तसेच कोरोनो उपाययोजनेसाठी खबरदारी घेतली जात आहे.कोरोना या विषाणूजन्य आजाराने संपूर्ण जगभर हाहाकार माजविला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ५ जण या महाभयंकर आजाराने ग्रस्त असून, यातील एकाचा मृत्यू झाला. परिणामी, जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश दिलेत. प्रशासकीय स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात असतानाच, खामगाव नगर पालिका प्रशासनाकडून स्व:स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहे. खामगाव शहरात दुसºयांदा निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी करण्यात आली असतानाच, आता शहराच्या विविध भागात लक्ष ठेवण्यासाठी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी नगर पालिकेतील विविध विभागातील कर्मचाºयांचा समावेश असलेली आठ दक्षता पथकं तैनात केली आहे. या पथकांकडून शहरातील प्रत्येक प्रभागावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सील ठोकण्यात आलेल्या प्रभागात तसेच कोरोना संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या परिसरावर  या पथकाची विशेष निगराणी आहे.

 सर्वच १६ प्रभागांवर पालिकेचे लक्ष!खामगाव शहरातील विविध वस्त्यांची १६ प्रभाग आणि  ३२ वार्डांमध्ये विभागणी केली आहे. नगर पालिकेच्या एका दक्षता पथकाकडे दोन प्रभागांची (चार वार्ड) जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक पथकाला एक चारचाकी वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरात प्रत्यक्ष फिरून हे पथक वार्डांवर लक्ष ठेवून आहे.

 उपनगराध्यक्ष पालिकेत तळ ठोकून!कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने खामगावात उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्या मार्गदर्शनात उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार गत दहा दिवसांपासून नगर पालिकेत तळ ठोकून आहेत. शहरातील निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी आणि स्वच्छतेबाबत ते स्वत: आढावा घेत आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस