खामगाव नगर पालिकेतील अधिकाऱ्यांशी अरेरावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 02:00 PM2019-09-18T14:00:35+5:302019-09-18T14:00:43+5:30

पालिकेत घडलेल्या या खळबळ जनक प्रकारानंतर बांधकाम अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंताही दीर्घ रजेवर गेले आहेत.

Khamgaon municipality officials are outraged! | खामगाव नगर पालिकेतील अधिकाऱ्यांशी अरेरावी!

खामगाव नगर पालिकेतील अधिकाऱ्यांशी अरेरावी!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक नगर पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाºयासह कनिष्ठ अभियंत्यांशी अशोभनिय वर्तणूक आणि अरेरावी करण्यात आली. हा प्रकार सोमवारी दुपारी नगर पालिकेतील अध्यक्षांच्या दालनात घडला. पालिकेत घडलेल्या या खळबळ जनक प्रकारानंतर बांधकाम अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंताही दीर्घ रजेवर गेले आहेत.
स्थानिक नगर पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिविगाळ आणि दमदाटी करण्याच्या प्रकारात गत काही महिन्यांपासून वाढ झाली आहे. गत शनिवारी उपमुख्याधिकारी यांना अपमानित आणि दमदाटी करण्याचा प्रकार ताजा असतानाच, सोमवारी पालिकेतील नगराध्यक्षांच्या दालनात बांधकाम अभियंता निरंजन जोशी आणि कनिष्ठ अभियंता शुभम कुळकर्णी यांच्याशी सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेवकाने (चाचा) वाद घातला. या वादाला सत्ताधारी पक्षाच्या ‘कारभारी’दादांनी चांगलीच हवा दिली. त्यामुळे नगराध्यक्षांच्या दालनात तब्बल दीड तास हे ‘दादागिरी’चे नाट्य रंगले. सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व असलेल्या एका वार्डात एका कार्यकर्त्याचे अतिक्रमण आहे. हे अतिक्रमण हटवून त्याठिकाणी नाली बांधणे गरजेचे आहे. मात्र, एका नगरसेवकाने सदर अतिक्रमण न हटविता नालीचे बांधकाम करण्यासाठी तगादा लावला. यावरून उफाळून आलेल्या वादामुळे नगरसेवक चाचाजी आणि त्यांच्या समर्थकांनी अध्यक्षांच्या दालनात बांधकाम अभियंता जोशी आणि कुळकर्णी यांना घेरले. त्यांच्याशी अशोभनिय वर्तणूक केली. त्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी अधिक माहितीसाठी बांधकाम विभागाचे अभियंता निरंजन जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्यासोबत वाईट घडले. यावेळी मनस्थिती बरोबर नसल्याचे सांगत अधिक माहिती देण्याचे टाळले. पालिकेतील एका अधिकाºयांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच बांधकाम विभागातील दोन्ही अभियंते रजेवर असल्याचे सांगितले.


बांधकाम अभियंता दीर्घ रजेवर!
सत्ताधारी नगरसेवकाच्या अरेरावीचा प्रकार बांधकाम अभियंता जोशी यांनी मुख्याधिकाºयांच्या कानावर घातला. याप्रकरणी पोलिस तक्रार करण्याचीही बाजू मांडली. मात्र, तत्पूर्वीच उपाध्यक्ष आणि एक सभापती पुत्र प्रकरण निस्तारण्यासाठी पालिकेत पोहोचले. यावेळी अभियंता जोशी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान, सोमवारी घडलेल्या या प्रकारामुळे अभियंता जोशी मंगळवारपासून दीर्घ रजेवर गेले आहेत. त्याचवेळी कनिष्ठ अभियंता शुभम कुळकर्णी देखील आजारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे मंगळवारी दिवसभर पालिकेतील बांधकाम विभागाचे कामकाज रखडले होते.


पालिकेतील अधिकारी, कर्मचारी टार्गेट!
गत काही दिवसांपासून पालिकेत सत्ताधारी आणि अधिकारी कर्मचाºयांचा वाद शिगेला पोहोचत आहे. त्याचवेळी सत्ताधारी नगरसेवकांमध्येही वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. गत १५ दिवसांच्या कालावधीत नगरसेवक आणि वरिष्ठ नेता, नगरसेवक आणि नगरसेवक समर्थकाचा वाद चर्चेत होता. त्यानंतर एका बड्या अधिकाºयांशी दमदाटी करण्यात आली. या प्रकाराची चर्चा थांबत नाही तोच, सोमवारी बांधकाम विभागातील अधिकाºयांना सत्ताधाºयांकडून ‘टार्गेट’ करण्यात आले.

Web Title: Khamgaon municipality officials are outraged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.