शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेच्या शाळेत एकाच वर्षात १९४ विद्यार्थ्यांची गळती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 15:10 IST

- अनिल गवई   खामगाव : स्थानिक नगरपालिकेच्या इंदिरा गांधी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत मोठी घसरण झाली. मागील शैक्षणिक सत्रात ...

- अनिल गवई खामगाव: स्थानिक नगरपालिकेच्या इंदिरा गांधी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत मोठी घसरण झाली. मागील शैक्षणिक सत्रात ३५६ इतकी असलेली पटसंख्या एकाच वर्षात १६२ पर्यंत खाली घसरली. तब्बल १९४ विद्यार्थी कमी झाल्याने ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून, इतक्या मोठ्या संख्येत विद्यार्थी गेले कुणीकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.स्थानिक नगरपालिकेच्या इंदिरा गांधी नगरपालिका हायस्कूलमध्ये सन २०१७-१८ च्या संच मान्यतेनुसार पटावर ३५६ ही विद्यार्थी संख्या दर्शविण्यात आली. त्याचप्रमाणे सन २०१८-१९ मध्ये संच मान्यतेनुसार १६२ इतकी विद्यार्थी संख्या दर्शविण्यात आली. त्यामुळे शैक्षणिक वर्ष आटोपत नाही तोच दुसऱ्या शैक्षणिक वर्षात तब्बल १९४ विद्यार्थ्यांची गळती लागली. दरम्यान, पटावर दाखविलेल्या आणि प्रत्यक्षात हजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येतसुद्धा मोठी तफावत आढळून येत आहे. बोगस विद्यार्थी संख्येच्या आधारे संच मान्यतेत नियमबाह्य शिक्षकसंख्या मान्य करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक आणि नुकसान केले. त्यामुळे ही शाळा चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टेकले हात!पटसंख्या आणि त्याआधारे संचमान्यतेच्या घोळामुळे इंदिरा गांधी नगर परिषद हायस्कूलची वरिष्ठ स्तरावरून चौकशी केली जात आहे. मोठ्या प्रमाणातील घोळामुळे नगर पालिकेतील वरिष्ठ अधिकाºयांनीही याप्रकरणी हात टेकल्याची चर्चा पालिका शिक्षण वर्तुळात होत आहे.संख्या जुळविण्यासाठी शिक्षकांची धावाधाव!शासनाकडे सादर करण्यात आलेली माहिती आणि प्रत्यक्षातील विद्यार्थी संख्येत प्रचंड तफावत आहे. त्यामुळे या शाळेतील शिक्षकांची विद्यार्थी संख्या जुळविण्यासाठी प्रचंड धावाधाव होत असल्याचे दिसून येते. परीक्षा आणि तपासणीच्या काळात विद्यार्थ्यांना स्वत: शिक्षक घेवून येताहेत. मात्र, तरीही आकडेवारीची जुळवाजुळव होत नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावSchoolशाळा