हद्दवाढीविनाच होणार खामगाव पालिकेची निवडणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 12:03 PM2021-08-26T12:03:45+5:302021-08-26T12:03:57+5:30

Khamgaon Municipal counsil election नगर पालिकेची आगामी निवडणूक ही हद्दवाढीशिवाय पार पडणार असल्याचे संकेत आहेत.

Khamgaon Municipal counsil elections to be held without boundaries! | हद्दवाढीविनाच होणार खामगाव पालिकेची निवडणूक!

हद्दवाढीविनाच होणार खामगाव पालिकेची निवडणूक!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:  शहराची हद्दवाढ पुन्हा ‘प्रक्रिये’च्या कचाट्यात अडकली आहे.  त्यामुळे पाच ग्रामपंचायतींचा ‘ग्रामीण टू शहरी’ होण्याच्या प्रतीक्षेला ब्रेक लागला असून, नगर पालिकेची आगामी निवडणूक ही हद्दवाढीशिवाय पार पडणार असल्याचे संकेत आहेत.
गत काही दिवसांपूर्वी खामगाव नगर पालिकेच्या हद्दवाढीच्या हालचालींनी कमालीचा वेग घेतला होता. मात्र, आता राज्य निवडणूक आयोगाने आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी कच्ची वाॅर्ड रचना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.  
डिसेंबर २०२१ अखेरीस मुदत संपणाऱ्या खामगाव पालिकेचाही निवडणूक पूर्व कार्यक्रम जाहीर झाला.  खामगाव शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव ‘प्रक्रिये’त अडकला आहे. 
परिणामी, निवडणुकीपूर्वी  खामगाव ग्रामीण, सुटाळा , सजनपुरी, सारोळा आणि घाटपुरी या पाच ग्रामपंचायतींची ‘ग्रामीण टू शहरी’ होण्याची  प्रतीक्षा कायम असल्याचे एकंदरीत चित्र येथे दिसत आहे.


अशी राहील वाॅर्डांतील लोकसंख्या ! 
n सन २०११ च्या जनगणनेनुसार खामगाव शहराची लोकसंख्या ९४ हजार १९१ इतकी आहे. दर्जानुसार ब-वर्ग नगर पालिका असलेल्या खामगावात ३३ वाॅर्ड संख्या निश्चित केली जाईल. 
n निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका वाॅर्डातील लोकसंख्या ही कमीत कमी २५७९ ते जास्तीत जास्त ३१३९ इतकी राहणार असल्याचे समजते.


वाॅर्डांची संख्याही         जैसे थे! 
खामगाव पालिकेची हद्दवाढ झाल्यास कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त सहा जागांची भर पडेल. त्यानुसार खामगाव शहरात ३७ ते ३९ वाॅर्ड तयार होतील. मात्र, आता हद्दवाढ रखडल्याने शहरातील जुनीच म्हणजे ३३ इतकी वाॅर्ड संख्या कायम ठेवत, आगामी निवडणूक पार पडेल. 


नगराध्यक्ष नगरसेवकांमधूनच! 
गत निवडणुकीच्या तुलनेत आगामी काळात प्रभाग पद्धती ऐवजी वाॅर्ड पद्धतीनुसार निवडणूक होईल. त्यामुळे आगामी नगराध्यक्ष हा नगरसेवकांमधून निवडला जाणार  आहे.

Web Title: Khamgaon Municipal counsil elections to be held without boundaries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.