शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेकडून रविवारीही करवसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 14:12 IST

खामगाव : मालमत्ता कराच्या अपेक्षीत उद्दीष्टपूर्तीसाठी खामगाव नगर पालिका प्रशासनाकडून रविवारी आणि सुटीच्या दिवशीही धडक वसुली मोहिम राबविण्यात येणार आहे.

- अनिल गवई  खामगाव : मालमत्ता कराच्या अपेक्षीत उद्दीष्टपूर्तीसाठी खामगाव नगर पालिका प्रशासनाकडून रविवारी आणि सुटीच्या दिवशीही धडक वसुली मोहिम राबविण्यात येणार आहे. मोठ्या थकबाकीदारांकडील वसुलीसाठी ४५ जणांचे जम्बो पथक गठीत करण्यात आले असून, रविवारी या वसुली मोहिमेस प्रारंभ होईल.मालकत्ता कराच्या वसुलीत खामगाव पालिका सुरूवातीपासूनच जिल्ह्यातील पालिकांमध्ये आघाडीवर आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला खामगाव पालिकेने कर वसुलीचे ६५ टक्के उद्दीष्ट गाठले. यासाठी प्रत्येकी सहा जणांचा समावेश असलेल्या ६ पथकं गठीत करण्यात आले होते. शहराच्या विविध भागात परिसरनिहाय या पथकाने कर वसुली केली. मात्र, काही मोठ्या थकबाकीदारांकडून मिळत असलेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे आता ६ पथकं आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या ‘जम्बो’ पथकाचे गठण करण्यात आले आहे.एक लाखाच्यावर थकबाकी असलेल्या करदात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. पालिकेचा अल्टिमेटम झुगारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचा सुत्रांचा दावा आहे.नगर पालिका कर विभागाच्या वतीने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांत १० कोटी ६६ लक्ष रुपयांचे उद्दीष्ट ठेवले आहे. दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरूवातीला पालिका प्रशासनाने ६ कोटी ६० लाख ४०८५३ रुपयांची कर वसुली केली. तथापि, मार्च महिन्यात शंभर टक्के कर वसुली अपेक्षीत असल्याने, नगर पालिका प्रशासनाच्यावतीने कर वसुलीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे.मोठ्या थकबाकीदारांची यादी झळकणार!मार्च अखेरीस शंभर टक्के कर वसुलीच्या अपेक्षेने पालिकेने वसुलीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असल्याचे दिसून येते. वसुली पथकाला अपेक्षीत सहकार्य न करणाºया कर दात्यांना आता दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसून येत आहे. दरम्यान, मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून, कर वसुली मोहिमेत सहकार्य न करणाºयांची नावे फलकावर झळकविण्यात येणार आहे.

शंभर टक्के कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत. कर वसुली मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद आवश्यक आहे. अपेक्षीत सहकार्य न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली जाईल. रविवारीही वसुली मोहिम राबविण्यात येईल.- धनंजय बोरीकरमुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावTaxकर