शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

#खामगाव कृषी महोत्सव : शिवजयंती उत्साहात, महिलांनी रांगोळीतून रेखाटले शिवराय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 4:02 PM

खामगाव : शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीरोजी दुपारी १२ वाजता कृषी महोत्सवस्थळी कृषी व फलोत्पादनमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी हजेरी लावली. 

ठळक मुद्देसोमवारी दुपारी १२ वाजता हिंदवी स्वराज्याचे निमार्ते छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी व  खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी  छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणदणुन गेला होता.

खामगाव : पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा कृषी महोत्सव शहरात सुरु आहे. या कृषी महोत्सवात शेतकºयांना आधुनिक तंत्रज्ञान व शेतीविषयक मार्गदर्शनासोबतच विविध सांस्कृतीक कार्यक्रम पार पडत आहेत. शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीरोजी दुपारी १२ वाजता कृषी महोत्सवस्थळी कृषी व फलोत्पादनमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी हजेरी लावली. १६ फेब्रुवारी पासून जलंब रोडवरील पॉलीटेक्नीक ग्राऊंडवर भव्य कृषी महोत्सव सुरु आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता हिंदवी स्वराज्याचे निमार्ते छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी व  खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा  अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, प्रकल्प संचालक आत्मा नरेंद्र नाईक, तहसीलदार सुनिल पाटील, जिल्हा मृद चाचणी अधिकारी जे.एस.गायकवाड, भाजपाचे शहराध्यक्ष संजय शिनगारे, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, मंडळ कृषी अधिकारी अविनाश सूर्यवंशी, वरदा रांजणे, सोनाली सोनवणे, दीपक दहिफळे, ओंकार अय्यम, अनंता अंभोरे, कृषी सहाय्यक अमोल धामणकर, कल्पना गिरी, निवृत्ती नागे यांचे सह कृषी विभागातील कर्मचारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी  छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणदणुन गेला होता.

रांगोळी स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाकृषि महोत्सवात आयोजित रांगोळी स्पर्धेला पॉलिटेक्नीक ग्राऊंडवर दुपारी २ वाजता सुरूवात झाली. रांगोळी स्पर्धेत शेकडो महिला, युवती, युवक उस्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.  स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, बेटी बचाव, बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण,  शेती व शेतकरी, निसर्ग, पाणी बचतीचे महत्व आदी विषयांवर रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात येत आहे.

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सवBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकर