शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

#खामगाव कृषी महोत्सव : विविध स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 15:47 IST

खामगाव: कृषि महोत्सवामध्ये ४00 च्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. 

ठळक मुद्देशेतकरी बचत गटाच्यग सदस्यांनी प्रक्रिया यंत्राच्ची माहिती उत्सुकतेने जाणुन घेताना दिसत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने संशोधित केलेली बीरहित मोसंबी, लिंबू, विविध प्रकारचा भाजीपाला पिके आदींची माहिती शेतकरी घेत आहेत. सौर उर्जेवरील यंत्र, कीटकनाशके, फवारणी यंत्रे बघण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी बांधव मोठी गर्दी करीत आहेत.

खामगाव: कृषि महोत्सवामध्ये ४00 च्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. कृषि महोत्सवात प्रक्रिया उद्योगासाठीचे यंत्र प्रात्यक्षिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. शेतकरी बचत गटाच्यग सदस्यांनी प्रक्रिया यंत्राच्ची माहिती उत्सुकतेने जाणुन घेताना दिसत आहेत. फलोत्पादन शेतीकडे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल दिसून आला.  याठिकाणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने संशोधित केलेली बीरहित मोसंबी, लिंबू, विविध प्रकारचा भाजीपाला पिके आदींची माहिती शेतकरी घेत आहेत. सौर उर्जेवरील यंत्र, कीटकनाशके, फवारणी यंत्रे बघण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी बांधव मोठी गर्दी करीत आहेत.  संरक्षित शेतीच येत्या काळात तारणार असल्याने, शेतकऱ्यांचा त्याकडेही ओढा असल्याचे दिसून येत आहे. तसेच हवामान बदल व पावसाची अनिश्चितता पाहता, शेतकरी त्रस्त आहे. त्यादृष्टीकोनातून कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे.

पशुसंवर्धन विभागाने देशातील व राज्यातील जातीवंत गायी, म्हैशी, शेळ्यांचे जतन केले आहे. या गायी, म्हशी, शेळी पालनाकडे शेतकऱ्यांनी वळावे आणि शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यावी. यासाठी याठिकाणी शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून दिली आहे. तसेच शेतात शेततळे करून त्यात मत्स व्यवसाय करण्याच्या दृष्टीकोनातून मत्स विभागाकडून मार्गदर्शन केल्या जात आहे.  कीटकशास्त्र विभागाच्या वतीने पिकांवर येणारी कीड व त्याचे व्यवस्थापन कसे करावे, यासंबधीची विस्तृत माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.  गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीचे झाले नुकसान पाहता,  कीटकशास्त्र व संशोधन विभागाने गुलाबी बोंड अळीचा पार्दुभाव रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे. याची माहिती उपलब्ध केली आहे. संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांकडून तंत्रशुद्ध माहिती याठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. राज्यभरातून आलेले बचतगटांचे साहित्य, प्रक्रिया केलेला शेतमाल, खाद्यपदार्थ शेतकरी व नागरीकांचे लक्ष वेधून घेत आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सवkhamgaonखामगावFarmerशेतकरी