शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

#खामगाव कृषि महोत्सव : पाणलोट प्रकल्पातून उलगडला शेतीचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 13:17 IST

खामगाव : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून खामगाव येथील कृषि महोत्सवात लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून पाणलोट प्रकल्पाची प्रतीकृती निर्माण करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईची वाढती समस्या डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. जलयुक्त शिवार अभियानाचे महत्व शेतकºयांना पटवून देणारा देखावा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय बुलडाणाकडून खामगाव येथील कृषि महोत्सवात मांडण्यात आला आहे.विकसीत व अविकसीत पाणलोटच्या या देखाव्यामुळे जलुयक्त शिवार अभियानाचे महत्व शेतकºयांना सहज समजून येते.

- ब्रम्हानंद जाधव

खामगाव : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून खामगाव येथील कृषि महोत्सवात लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून पाणलोट प्रकल्पाची प्रतीकृती निर्माण करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानाचा संदेश देणाºया या पाणलोट प्रकल्पातून शेतीचा विकास कसा साधला जातो याचे वास्तव या उलगडले आहे. पाणी टंचाईची वाढती समस्या डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी जयलुक्त शिवार अभियानासारखे विविध उपक्रम राज्यात राबविले जात आहेत. जलयुक्त शिवार अभियानाचे महत्व शेतकºयांना पटवून देणारा देखावा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय बुलडाणाकडून खामगाव येथील कृषि महोत्सवात मांडण्यात आला आहे. या प्रदर्शनीमध्ये विकसीत पाणलोट व अविकसीत पाणलोट याचा जीवंत नमुनाच प्रशासनाने तयार केला आहे. त्यातुन विकसीत पाणलोटमुळे शेतीला होणारे फायदेही स्पष्ट केले आहेत. विकसीत पाणलोटमध्ये सामुहिक शेततळे, फुलशेती, फळबाग, भाजीपाला, मातीनाला बांध, उताराला आडवी पेरणी, ढाळीचे बांध, मागेल त्याला शेततळे, सलग समतल चर यासारख्या अनेक बाबींवर देखाव्याच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. तर अविकसीत पाणलोटच्या देखाव्यामध्ये कोरडे पडलेले बांध व दुष्काळसदृश परिस्थीतीचे चित्र दिसून येते. विकसीत व अविकसीत पाणलोटच्या या देखाव्यामुळे जलुयक्त शिवार अभियानाचे महत्व शेतकºयांना सहज समजून येते. प्रदर्शनात येणाºया  शेतकºयांना पाणलोटचा हा देखावा आकर्षीत करत आहे.

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सवWaterपाणीkhamgaonखामगाव