शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव: लहान मुलांच्या वादातून दोन गटात जुपंली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 16:40 IST

ही घटना सोमवारी रात्री ८ वाजता दरम्यान स्थानिक मस्तान चौकात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: लहान मुलांच्या वादातून एकाच समाजाच्या दोन गटात हाणामारी झाली. यात तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजता दरम्यान स्थानिक मस्तान चौकात घडली.मस्तान चौक, जुना फैल भागातील दोन कुटुंबात जुना वाद आहे. लहान मुलांच्या खेळण्यावरून हा वाद सोमवारी सायंकाळी पुन्हा उफाळून आला. त्यामुळे दोन्ही गटातून दगडफेक करण्यात आली. तसेच दोन गटातील दोघांमध्ये हाणामारी झाली. यात एका लहानमुलीसह तिघे जण जखमी झाले.  या घटनेची माहिती मिळताच शहर आणि शिवाजी नगर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन गटातील काळी जणांना ताब्यात घेण्यात आले. जखमी पैकी एकाला खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. जखमी झालेल्या एका इसमाचे नाव सै. अक्रम असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. वृत्त लिहीस्तोवर शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये दोन्ही गटाविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरू होती. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात दगडफेक झाली. यात तीन जण किरकोळ जखमी झाल्याचे शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षण सुनिल हुड यांनी सांगितले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

 अप्पर पोलिस अधिक्षक पोहोचले घटनास्थळी!संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या खामगावातील मस्तान चौकात दोन गटात वाद उफाळून आल्याची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांनीही घटनास्थळी धाव घेत, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी