शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : बंदमुळे एसटीचे लक्षावधीचे उत्पन्न बुडाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:30 IST

खामगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदमुळे बुधवारी एसटी महामंडळाचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले.  एसटीच्या खामगाव आगारातील  ४६६ फेर्‍या रद्द झाल्या. परिणामी, खामगाव एसटी आगाराचे तब्बल सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, जिल्ह्यात ४५ लाखांच्या घरात असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देखामगाव आगाराच्या ४६६ फेर्‍या रद्द प्रवाशांचीही गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदमुळे बुधवारी एसटी महामंडळाचे लक्षावधी रुपयांचे नुकसान झाले.  एसटीच्या खामगाव आगारातील  ४६६ फेर्‍या रद्द झाल्या. परिणामी, खामगाव एसटी आगाराचे तब्बल सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, जिल्ह्यात ४५ लाखांच्या घरात असल्याची माहिती आहे.१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यात सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मंगळवारी या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक बंद होती. यामध्ये खासगी वाहतुकीसोबतच एसटी महामंडळाचाही समावेश होता.  बुलडाणा विभागात बुलडाणा, चिखली, खामगाव, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद आणि शेगाव आगाराचा समावेश असून, बुधवारी जिल्ह्यातील सर्वच आगारामध्ये एसटी बस उभ्या होत्या. परिणामी, सर्वच सातही आगारांतील एसटीचे शेड्युल्ड रद्द झाल्याने हजारो फेर्‍या प्रभावित झाल्या होत्या. यामध्ये खामगाव आगारातील ६३ शेड्युल्ड म्हणजेच ४६६ फेर्‍या तर मलकापूर आगारातील ६४ शेड्युल्ड तर शेगाव आगारातील १६७ बसफेर्‍या रद्द झाल्या. हीच स्थिती जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मेहकर, जळगाव जामोद  येथेही दिसून आली. त्यामुळे  खामगाव आगाराचे सहा लाख रुपयांचे, मलकापूर आगाराचे सात लाख रुपयांचे तर शेगाव आगाराचे साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. बुलडाणा, मेहकर, चिखली, जळगाव जामोद आगारालाही मोठय़ा प्रमाणात फटका बसल्याने, बुलडाणा जिल्ह्यात एसटीला सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.     

प्रवासी उत्पन्नात घट!एसटी कर्मचारी संप, अवैध प्रवासी वाहतूक, डीझल दरवाढ, प्रवासी कर यामुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी उत्पन्नात घट होत आहे. त्यातच भरीस भर म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि आकस्मिक संकटाचाही सामना एसटी महामंडळाला करावा लागत आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासी उत्पनाला फटका बसत आहे.

बंदमुळे खामगाव आगारातील ६३ शेड्युल्ड रद्द झाल्याने, ४६६ फेर्‍या प्रभावित झाल्या. त्यामुळे खामगाव आगाराचे सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले.- आर. आर. फुलपगारे,आगार व्यवस्थापक, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावstate transportराज्य परीवहन महामंडळ