शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खामगावच्या तीन नगरसेवकांचे पद कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 16:19 IST

खामगाव : स्थानिक नगरपालिकेचे उपाध्यक्ष संजयमुन्ना पुरवार यांच्यासह दोन नगरसेविकांना अपात्र ठरविण्यासाठी दाखल रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात खारिज करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक नगरपालिकेचे उपाध्यक्ष संजयमुन्ना पुरवार यांच्यासह दोन नगरसेविकांना अपात्र ठरविण्यासाठी दाखल रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात खारिज करण्यात आली. काँग्रेसपक्षनेत्या अर्चना टाले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी निर्णय दिला. या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपच्या गोटात आनंद व्यक्त होत असतानाच, विरोधी पक्ष नेते असलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या खामगाव नगर पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढणाऱ्या संजय मुन्ना पुरवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांची पालिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. तर अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या शहेरबानो जहीरशहा आणि जकीयाबानो मो. अनिस जमादार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करणाºया पुरवार आणि दोन अपक्ष नगरसेविकांवर पक्षातंर बंदी कायद्यान्वये अपात्र ठरविण्यासाठी काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले आणि नगरसेवक इब्राहिम खा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली.यामध्ये जिल्हाधिकाºयांनी संजय पुरवार यांना पात्र तर नगरसेविका शहेरबानो जहीरशहा आणि जकीयाबानो मो. अनिस जमादार यांना अपात्र ठरविले. त्यानंतर दोन नगरसेविकांनी राजमंत्री नगरविकास यांच्याकडे पात्र ठरविण्यासाठी अपिल दाखल केले. त्याचवेळी मुन्ना पुरवार यांना अपात्र ठरविण्यासाठी नगरसेविका टाले आणि इब्राहीम खान यांनीही राज्यमंत्र्यांकडे याचिका दाखल केली.राज्यमंत्र्यांनी पुन्हा मुन्ना पुरवार यांचे पद कायम ठेवत, दोन्ही नगरसेविकांना पात्र ठरविले. याप्रकरणी आक्षेप नोंदवित काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले आणि नगरसेवक इब्राहिम खान यांनी तिन्ही नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवार २२ जुलै रोजी न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावली झाली. २२ जुलै राखून ठेवण्यात आलेला निकाल २९ जुलै रोजी देण्यात आला. यामध्ये काँग्रेस नगरसेविका अर्चना टाले, इब्राहिम खान खांची याचिका फेटाळून लावत, तिन्ही नगरसेवकांना पात्र ठरविले. याप्रकरणी भाजप नगरसेवकांच्यावतीने अ‍ॅड. सुरेश मेहाडिया यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. रमेश भट्टड यांनी सहकार्य केले. याप्रकरणी काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले यांच्याशी संपर्क साधला असता, त्या उपलब्ध होवू शकल्या नाहीत. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावhighwayमहामार्ग