खामगाव: कोरोना लसीकरणाचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 11:13 AM2021-05-12T11:13:55+5:302021-05-12T11:14:05+5:30

Khamgaon News : लसीकरण सुरळीत करण्यासाठी प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचे मंगळवारी दिसून आले.

Khamgaon: Corona vaccination planning collapses | खामगाव: कोरोना लसीकरणाचे नियोजन कोलमडले

खामगाव: कोरोना लसीकरणाचे नियोजन कोलमडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना प्रतिबंधासाठी कोविड-१९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे लसीकरण मोहीम वांद्यात सापडली असतानाच, लसीकरणासाठी गर्दी नियंत्रित करण्यासाठी तसेच लसीकरण सुरळीत करण्यासाठी प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचे मंगळवारी दिसून आले.
लसीकरण सुरू असतानाच ऐनवेळी लसीकरण केंद्रावर सावलीसाठी मंडप टाकण्यात आला. 
गर्दी नियत्रंणात आणण्यासाठी चक्क पोलिसांना प्रयत्न करावे लागले. खामगाव येथील टॉवर चौकातील नगर परिषद दवाखान्यात आधी हे लसीकरण केंद्र सुरू होते. मात्र या ठिकाणी इतर रुग्ण व लसीकरणासाठी येणारे नागरिक यामुळे दररोज मोठी गर्दी होत होती. 
त्यामुळे हे लसीकरण केंद्र सिव्हिल लाईन भागातील न.प. शाळा क्र. ९ मध्ये हलविण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी या ठिकाणी दुसरा डोस घेणाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी सकाळपासूनच लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. लसीकरण केंद्रावर कुठलेही नियोजन नसल्याने नागरिकांनी एकच झुंबड केल्याचे दिसून आले. लस मिळावी यासाठी नागरिक चढाओढ करीत होते. 

Web Title: Khamgaon: Corona vaccination planning collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.