शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

खामगाव : पळशीजवळ भरधाव ट्रकची मालवाहूला ऑटोला धडक; २ ठार, ६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:09 IST

पळशी बु. (खामगाव): भरधाव ट्रकने मालवाहू ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात  २ व्यक्ती ठार त ५ गंभिर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता खामगाव  तालुक्यातील पळशी बु. येथे घडली. अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना अकोला येथील सर्वाेपचार रुग्णालयात  उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

ठळक मुद्दे ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता पळशी बु. येथे घडलीमृतांची नावे : सविता अंबादास कळस्कार व त्र्यंबक वामन चिंचोळकर जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पळशी बु. (खामगाव): भरधाव ट्रकने मालवाहू ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात  २ व्यक्ती ठार त ५ गंभिर जखमी झाले. ही घटना गुरुवार ४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथे घडली. अपघातात जखमी झालेल्या सहा जणांना अकोला येथील सर्वाेपचार रुग्णालयात  उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. बाळापूरकडे जाणार्‍या पळशी बु. येथील एम.एच.२८-आर-१५६0 क्रमांकांच्या  मालवाहू ऑटोला, विरुद्ध दिशेने भरधाव येणार्‍या एम.एच. सी. ५४५0  क्रमांकांच्या ट्रकने जोरदार धडक दिली. विरुद्ध दिशेने येणारा ट्रक बाळापूरवरुन लाखनवाड्याकडे जात होता. अपघातात मालवाहू आॅटोने प्रवास करणारे सविता अंबादास कळस्कार (वय ४५) रा. हिंगणा-उमरा व त्र्यंबक वामन चिंचोळकर (वय  ६७) रा. वाडेगाव हे दोघे ठार झाले. तर कौशल त्र्यंबक चिंचोळकर (वय ६0),  भास्कर धुरंदर (वय ५५) दोघेही रा. फत्तेपूर, विजयमाला भास्कर धुरंधर (वय ५0),  ज्योतीराम जयराम बुजाडे दोघेही रा, बोरगाव मंजू व त्यांच्यासोबत मालवाहू ऑटोमध्ये  प्रवास करित असलेले आणखी दोघे जण जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्या  सहाही जणांना अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार  रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. जखमींना ताबडतोब उपचार मिळावेत  यासाठी अकोला येथील सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी मोलाचे सहकार्य केले. 

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघातDeathमृत्यू