शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

खामगाव आगाराकडून वारकरी, विद्यार्थी वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 15:46 IST

वारकरी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींसोबतच एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आगारातील गलथान कारभाराचा पाढा वाचला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : स्थानिक बसस्थानकावर वारकरी आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याच्या तक्रारी वाढीस लागल्यानंतर सोमवारी आ. आकाश फुंडकर, तहसिलदार शितल रसाळ आणि शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष टाले यांनी बसस्थानकात धडक दिली. यावेळी वारकरी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींसोबतच एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आगारातील गलथान कारभाराचा पाढा वाचला. त्यामुळे आगार व्यवस्थापक आर. आर. फुलपगारे यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले.खामगाव आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी तीन तास प्रतीक्षा करूनही पंढरपूर बस न लागल्यामुळे वारकरी संतप्त झाले. त्यांनी ही बाब आ.आकाश फुंडकर यांच्यासह स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्याचवेळी सोमवारी ग्रामीण भागातील अनेक फेºया रद्द करण्यात आल्याची तक्रार ही विद्यार्थ्यांनी केली. त्यामुळे बसस्थानकात तात्कळत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रारींचा पाढा उपस्थितांसमोर वाचला.भरीस भर म्हणून काही कर्मचाºयांनी देखील आगार व्यवस्थापकांच्या तक्रारीची री ओढली. त्यामुळे यापुढे तक्रारी प्राप्त झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचा इशारा आ.आकाश फुंडकर यांनी दिला. तसेच प्रशासनाकडूनही योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश स्थानक प्रमुख आणि आगार प्रमुखांना देण्यात आले. यावेळी विद्यार्थी, वारकरी संतप्त झाल्याने बसस्थानकातील वातावरण चांगलेच तापले होते. यासंदर्भात अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापक आर.आर. फुलपगारे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.तात्काळ सुटल्या बसआगार व्यवस्थापकांची कान उघडणी करण्यात आल्यानंतर खामगाव आगारातून पंढरपुरसाठी तात्काळ बस सोडण्यात आली. त्याचवेळी ग्रामीण भागातही काही बसेस सोडण्यात आल्या. मात्र कोंटी, श्रीधरनगरकडे जाणाºया प्रवाशांची संख्या अधिक असल्याने विद्यार्थ्यांना टपावरून प्रवास करावा लागला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावstate transportएसटीStudentविद्यार्थी