शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात कावड यात्रेचा ‘माहोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 17:35 IST

खामगाव : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी, ३ सप्टेंबररोजी  शहरातून भव्य कावड यात्रा निघाली.

ठळक मुद्दे खामगाव शहरात या कावड यात्रा उत्सवाला भव्य-दिव्य स्वरूप येताना दिसत आहे.कावडधारींनी वेगवेगळ्या ठिकाणावरून आणलेल्या पवित्र जलाव्दारे पहाटेच शिवमंदीरांमध्ये जलाभिषेक केला.

खामगाव : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी, ३ सप्टेंबररोजी  शहरातून भव्य कावड यात्रा निघाली. कावडयात्रा उत्सवाला शहरात वर्षागणिक भव्य-दीव्य स्वरूप येत आहे. शहरातून निघालेल्या कावडयात्रेत १३ कावडधारी मंडळ सहभागी झाले होते. ‘हर बोला महादेव’ च्या गजराने अवघे शहर दणाणून गेले होते. श्रावण महिना हिंदु संस्कृतीत अतिशय पवित्र मानला जातो. श्रावणातील सोमवारला विशेष महत्व असून सोमवारी शिवपिंडीला पवित्र जलाव्दारे अभिषेक घालण्याची परंपरा आहे. त्यामुळे प्रत्येक श्रावण सोमवारी शिवभक्त कावडधारी वेगवेगळ्या तिर्थस्थळावरून पवित्र जल आणून शिवमंदीरात जलाभिषेक करीत असतात. उत्सवांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाºया खामगाव शहरात या कावड यात्रा उत्सवाला भव्य-दिव्य स्वरूप येताना दिसत आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी शहरातील विविध मंडळांचे शेकडो कावडधारी तीर्थस्थळांवरून खांद्यावर कावड घेवून जल आणत असतात. आज रावणातील शेवटचा सोमवार असून कावडधारींनी वेगवेगळ्या ठिकाणावरून आणलेल्या पवित्र जलाव्दारे पहाटेच शिवमंदीरांमध्ये जलाभिषेक केला. त्यानंतर वाजत-गाजत कावडधारींची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये नवयुवक मानाची कावडयात्रा मंडळ दाळफैल, नेताजी मंडल जलालपुरा, जगदंबा बाळापूर फैल, जय भवानी चांदमारी, वीर हनुमान शंकर नगर, जगदंबा बाळापूर फैल, काशी विश्वनाथ कावडयात्रा मंडळ धोबी खदान, जय संतोषी मॉ फरशी, बजरंग दल गोपाळ नगर, शिवभक्त मंडळ सजनपूरी, शिवाजी मित्र मंडळ शिवाजी नगर, कालिंका सार्वजनिक मंडळ शिवाजी वेस, श्रीकृृष्ण मंडळ रेखा प्लॉट या १३ मंडळांनी वेगवेगळ्या भागातून डी.जे. पारंपारीक वाद्य वाजवून भव्य मिरवणूक काढली. यामध्ये शिवभक्त नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकीदरम्यान पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. 

लोकप्रतिनिधीकडून स्वागत कावडयात्रेचे शहरात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींकडून स्वागत करण्यात आले. महाराष्ट्Ñ भाजप मिडिया सेलचे सदस्य सागर फुंडकर व भाजप पदाधिकाºयांनी कावडधाºयांचे स्वागत करून शिवप्रतिमांचे दर्शन घेतले. याशिवाय बुलढाणा जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष तेजेंद्रसिंग चौहान यांनी कावड यात्रेचे स्वागत  केले. कावड यात्रेत शहरातील अनेक कावड यात्रा मंडळासह अकोल्यातून गायगाव, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर तालुक्यातील मंडळेही सहभागी झाले होते.

टॅग्स :khamgaonखामगावIndian Traditionsभारतीय परंपराIndian Festivalsभारतीय सण