शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय, सामाजिक समीकरणांची सांगड घालत मातृतिर्थाचा विकास घडवू - राजेंद्र शिंगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 15:09 IST

राजकीय समीकरणाचा सामाजिक समीकरणाशी सांगड घालून मातृतिर्थाचा विकास घडवून आणू असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: राजकीय समीकरण ज्या प्रमाणे राज्यात जुळले तेच समीकरण बुलडाणा जिल्ह्यात जुळले असून या राजकीय समीकरणाचा सामाजिक समीकरणाशी सांगड घालून मातृतिर्थाचा विकास घडवून आणू असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.पंचायत समितीमध्ये आयोजित शासकिय कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा नितीन पवार होत्या. उदघाटक म्हणून कमलबाई जालिंधर बुधवत उपस्थित होत्या. प्रमूख अतिथी म्हणून कृषी सभापती दिनकरराव देशमूख, जि. प. सदस्य राम जाधव, जि. प. सदस्य सरस्वती वाघ, जि. प. सदस्य पुनम. राठोड, जि. प. सदस्य सिंदूबाई खंडारे , सभापती नंदिनी देशमूख, उपसभापती लता खरात, पं. स. सदस्य राजू ठोके, उज्वला युवराज नागरे, अश्विनी बोडखे, मीना गजानन बंगाळे, दीपा सुखा राठोड, संतोष आडे, शिक्षणाधिकारी खान, तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते. जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने ३११ कोटींचा विकास आराखडा मंजूर केला आहे. या विकास आराखड्यातील कामासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटीबद्ध आहे. जास्तीत जास्त कामे लवकरात लवकर कसे होतील यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुंख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करू असे अश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सर्वप्रथम जिजाऊ माँ साहेबांचे पुजन करून अभिवादन केले. त्यानंतर सर्वच उपस्थित मान्यवरांनी पुजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गटविकास अधिकारी शिंदे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, प्रवीण गिते, भानुदास लव्हाळे यांनी प्रयत्न केले.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Dr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेJijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवjijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजा