शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

जिजाऊ जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर; राजवाड्यावर जिजाऊंची महापूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 17:17 IST

सूर्योदय समयी मंगलमय वाद्यात ढोलताशाच्या गजारात व फटाक्यांच्या अतिशबाजीमध्ये गुलालाची उधळण करीत मराठा सेवा संघ, जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे, जिजाऊ ब्रीगेड, संभाजी ब्रीगेड, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समीती व महाराष्ट्र शासनाच्या वतीने १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ मॉ साहेबांची महापुजा करुन जिजाऊंना अभिवादन करण्यात आले.

- काशिनाथ मेहेत्रे

सिंदखेड राजा - सूर्योदय समयी मंगलमय वाद्यात ढोलताशाच्या गजारात व फटाक्यांच्या अतिशबाजीमध्ये गुलालाची उधळण करीत मराठा सेवा संघ, जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महाराष्ट्र शासनाच्यावतीने १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ माँसाहेबांची महापूजा करुन जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. जिजाऊ माँसाहेबांच्या ४२१ व्या जंयतीनिमित्त जिजाऊ भक्तांनी सिदंखेड राजा नगरीत गर्दी केली होती.  मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जन्मस्थळ राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर १२ जानेवारी रोजी सूर्योदयापासूनच महाराष्ट्रसह देशाच्या कानाकोपऱ्यातून माँ जिजाऊचरणी लीन होऊन माँ साहेब जिजांऊचे आर्शीवाद घेण्यासाठी जनसागर उसळला होता. जिजाऊंच्या जन्मस्थळावर हार फुलांनी सजावट करण्यात येऊन विवध रांगोळी काढण्यात आल्या होत्या.

जिजाऊ माँ साहेब जिजाऊ, सावित्रीमाई, शिवजी महाराज यांच्या वेशभूषा करुन जिजाऊ भक्त राजवाड्यात दाखल झाले होते. सूर्योदयसमयी, मराठा सेवा संघाच्यावतीने प्रमुख दाम्पत्यांनी जिजाऊ पूजन केले. विजयकुमार घोगरे, जयश्री कामाजी पवारी, विणा लोखंडे, रेखा दत्तात्रय चव्हाण, वंदना मनोज आखरे, अर्चना सुभाष कोल्हे, किरण ठोसरे, ज्योती शिवाजी जाधव, अरुणा योगेश पाटील, लखुजीराव जाधव यांचे वंशज संगीताताई शिवाजी राजेजाधव यांनी सपत्निक तसेच राजुकाका राजे जाधव, संदीप राजे जाधव, प्राचार्य अरुण राजे जाधव यांनी पूजन केले. नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष अ‍ॅड नाझेर काझी, उपनगराध्यक्ष सीमा मुरलीधर शेवाळे, मुख्याधिकारी एच. डी. वीर व त्यांच्या सर्व आजी माजी नगर अध्यक्ष तसेच नगरवेक व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे, डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे व त्यांनतर खासदार प्रतापराव जाधव, राजश्री जाधव सपत्निक, मंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, उषा खेडेकर, जालींदर बुधवत, ऋषीकेश जाधव, श्रीनिवास खेडेकर, अतीश तायडे, शिवप्रसाद ठाकरे, संजय मेहेत्रे यांनी अभिवादन केले.  तर भाराकाँचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे, जयश्री शेळके, जगन ठाकरे, मनोज कायंदे, शहाजी चौधरी यांनी अभिवादन केले. पालक मंत्री मदन येरावार, आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार तोताराम कायंदे, विनोद वाघ, शाम जाधव, सुनिल कायंदे, सरस्वती वाघ, अभिनेते अमोल कोल्हे यांनी जिजाऊंना अभिवादन केले. 

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्यावतीने अभिवादनजिल्हा परिषद व पंचायत समितीचे वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, उपाध्यक्षा मंगलाताई रायपुरे यांच्यासह जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी षन्मुखराजन, राजेश ठोके, संर्वगविकास अधिकारी विठ्ठल जाधव व सर्व जिल्हा परिषद व पंचायत समीती सदस्यांनी अभिवादन केले.

 

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवjijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजाSindkhed Rajaसिंदखेड राजाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडा