शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

बुलडाणा जिल्ह्यातील सहा गावांच्या टप्प्याने जिगावचे पुनर्वसन

By admin | Updated: March 3, 2015 01:33 IST

महसूलमंत्री खडसे यांची घोषणा; खडकपूर्णासह इतर प्रकल्पांचाही घेतला आढावा.

बुलडाणा : जिल्ह्यातील खडकपूर्णा व जिगाव प्रकल्पांमुळे बाधित गावांचे पुनर्वसन हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. यामधील जिगाव प्रकल्पाचे पुनर्वसन करताना सहा गावांचे एक याप्रमाणे पाच टप्प्याटप्प्यात पुनर्वसन करावे व तेथे सर्व मूलभूत नागरी सुविधा देण्यात याव्यात, असे निर्देश कृषी, मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले.जिगाव, खडकपूर्णा, पेनटाकळी व लघू प्रकल्पातील पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सोमवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार पांडुरंग फुंडकर, संजय रायमूलकर, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत खेडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर आदी उपस्थित होते. जिगाव प्रकल्पामध्ये पूर्णत: ३२, अंशत: १५ अशा एकूण ४७ गावांचे पुनर्वसन करावयाचे आहे. त्यापैकी पूर्णत: बाधित ३२ गावांमध्ये पुनर्वसनासाठी नवीन गावठाण निश्‍चित करण्यात आले आहे. या गावांच्या पुनर्वसनाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात यावे व पहिल्या टप्प्यात सहा गावे घेऊन त्याचे आदर्श पुनर्वसन व्हावे, अशी अपेक्षा महसूलमंत्र्यांनी व्यक्त केली. जिगाव प्रकल्पात ७ हजार ९८0 कुटुंबे बाधित झाली आहेत. कायद्याप्रमाणे पुनर्वसित गावांमध्ये किमान १८ नागरी सुविधा देण्याचे निर्देशित करीत पुनर्वसनाच्या कामामध्ये बेजबाबदारी बाळगणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणार असल्याचेही खडसे म्हणाले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशंपाडे, उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुळकर्णी, पवार, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनावणे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब ठेंग, मिथिलेश चव्हाण आदी उपस्थित होते.