शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिगाव: पुनर्वसनाच्या कामाने घेतला वेग; प्लॉटची मोजणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 11:11 IST

पुनर्वसन करावयाच्या ४७ गावांपैकी काही गावातील भुखंड वाटपाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढणाऱ्या जिगाव प्रकल्पातंर्गत पुनर्वसन करावयाच्या ४७ गावांपैकी काही गावातील भुखंड वाटपाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. त्यानुषंगाने पलसोडा येथे सध्या पुनर्वसन विभागाचे अधिकारी, कर्मचारी ठाण मांडून आहेत.दरम्यान, २३ जुलै रोजी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांनी जिगाव प्रकल्पाच्या पुनर्वसनासंदर्भातील कामांचा आढावा घेतला होता. त्यावेळी पुनर्वसनाच्या कामांना प्राधान्य देण्याचे त्यांनी सुचीत केले होते. जानेवारी २०२१ पर्यंत पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करावयाच्या गावांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. प्रामुख्याने १३ गावातील कामे तथा प्लॉट वाटपास प्राधान्य द्यावयास सांगण्यात आले होते.त्यानुषंगाने २२ जुलै पासून पुनर्वसन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामास प्रारंभ केला आहे. खरकुंडी येथील काम सुरू झाले ््असून त्यात आलेल्या काही त्रुट्यांमुळे भूखंड वाटपात अडचणी येत आहेत. प्रारंभी येथील बाधीतांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मलकापूरचे आमदार राजेश ऐकडे, प्रशासनाचे अधिकारी सध्या येथे भुखंड वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागपंचमी सणानिमित्त हे काम बंद राहणार असल्याने २६ जुलै पासून पुन्हा ते सुरू होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. येत्या काळात जिगाव, पलसोडा, टाकळी वतपाळ येथील काम पूर्ण करण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे बाधीत होणाºया कुुटुांंची संख्या सातहजार ९८० असून ९६ कुटुंबांचे आतापर्यंत पूनर्वसन करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास २४ कोटी रुपयांचा खर्च आला असून अद्यापही ४५ गावांचे खºया अर्थाने पुनर्वसन बाकी आहे. दुसरीकडे जिगाव प्रकल्पासाठी एकूण १७ हजार १३८ हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार असून त्यापैकी चार हजार २४९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप १२ हजार ८८८ हेक्टर जमीन संपादीत करणे बाकी आहे. संपादीत जमिनीच्या मोबदल्यापोटी ५१७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून सध्या ५७६ कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असल्याची माहिती आहे. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांच्या निर्देशानुसार काम सुरू आहे.जानेवारी २०२१ पर्यंत प्लॉट वाटप करणारजिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बाधीत होणाºया ३२ गावातील नागरिकांच्या पूनर्वसनाच्या दृष्टीने प्लॉटची मोजणी करून त्याचे काम जानेवारी २०२१ पर्यंंत पुर्ण करावयाचे आहे. २३ जुलै रोजी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतलेल्या आढाव्या दरम्यान, ही कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यानुषंगाने पुनर्वसन विभागाचे अधिकारी सध्या पलसोडा या गावात तीन दिवसापासून ठाण मांडून बसले आहेत.दोन गावांचे पुनर्वसन पुर्ण; ४५ गावांचे बागीजिगाव प्रकल्पातंर्गत ३२ गावांचे पुर्णत: आणि १५ गावांचे अंशत: असे एकूण ४७ गावांचे पूनर्वसन करावयाचे आहे. कोदरखेड गावाचे प्लॉट वाटपाचे काम पूर्णत्वास आले असून खरकुंडी गावाचे पुनर्वसन झाले आहे. ९६ कुटुंबांना त्याचा फायदा झाला आहे. पुनर्वसन करावयाच्या २२ गावापैकी नऊ गावांची कामे अद्याप सुरू झालेली नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प