शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जिगाव पूनर्वसन; १९ गावांची झाली स्थळ निश्चिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 13:03 IST

१७ गावांच्या पूनर्वसनासाठी स्थळ निश्चिती झाली असून या खरकुंडी गावासाठीच्या पूनर्वसनाचे काम जवळपास १०० टक्के पूर्ण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या जिगाव प्रकल्पामध्ये पुर्णत: तथा अंशत- ४७ गावांच्या पूनर्वसनाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १९ गावांचे पूनर्वसन करण्यात येत असून त्यापैकी १७ गावांच्या पूनर्वसनासाठी स्थळ निश्चिती झाली असून या खरकुंडी गावासाठीच्या पूनर्वसनाचे काम जवळपास १०० टक्के पूर्ण झाले आहे.महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तींचे पूनर्वसन अधिनियम १९९९ च्या कायद्यातंर्गत ही कामे सुरू असून या पूनर्वसित गावठाणामध्ये एकुण १८ नागरी सुविधा पुरवाव्या लागणार आहेत.या प्रकल्पामुळे ३२ गावे पूर्णत: तर १५ गावे अंशत: बाधीत होत आहेत. त्यानुषंगाने एकुण पाच टप्प्यात भूसंपादनासह अनुषंगीक कामे करण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील पूनर्वसनाच्या अनुषंगाने १९ गावांपैकी १७ गावांसाठीची स्थळ निश्चिती पूर्णत्वास गेली आहे.मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमध्ये समाविष्ट असलेल्या जिगाव प्रकल्पाचे सध्याच्या घडीला ६० टक्के काम पूर्ण झाले असून २०२१ पर्यंत या प्रकल्पामध्ये अंशत- १०४ दलघमी पाणी साठवण्याचे उदिष्ट ठरविण्यात आलेले असून जवळपास १२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा प्रशासनाचा मानस आहे.प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर जिल्ह्यात एक लाख एक हजार ८८ हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा निर्माण होऊन बुलडाणा जिल्ह्याची पाणीसाठवण क्षमता ही जवळपास ३६ टीएमसीच्या आसपास पोहोचेल. सोबतच प्रकल्पाचा लाभ हा बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातील २८७ गावांना होणार असून या प्रकल्पामुळे जवळपास २७ हजार ६०० ऐवढी लोकसंख्या पूनर्वसित करावी लागणार आहे. त्यादृष्टीने हाता भूसंपादनाच्या प्रक्रियेपासून पूनर्वसनाच्या प्रक्रियेने काहीसा वेग पकडला असल्याचे जिल्हा पूनर्वसन विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, २०१४ पासून प्रकल्पासाठीचे आणि पूनर्वसनासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती. अन्य गावांच्या पूनर्वसनाचीही प्रक्रिया सुर आहे.

आठ हजार कुटुंबे प्रभावीतया प्रकल्पामुळे पूर्णत: बाधीत गावातील सात हजार ५९२ तर अंशत: बाधीत गावातील ४३२ कुटुंबे प्रभावीत होणार आहेत. दरम्यान त्यांच्या पूनर्वसनाच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यातील १९ गावांसाठीच्या जागांची स्थळ निश्चिती झाली असून खरकुंडीचे पूनर्वसन हे नांदुरा तालुक्यातील आलमपूर येथे करण्यात येत असून येथील भूसंपादन, नागरी सुविधांची कामे ही १०० टक्के पूर्णत्वास गेली असल्याचे जिल्हा पूनर्वसन विभागाचा अहवाल स्पष्ट करतो. त्यानंतर कोदरखेड, जिगाव, टाकळी वतपाळ, पलसोडा या गावांच्या पूनर्वसनाच्या दृष्टीने गावठाणांची पुनर्वसित गावठाणाची अनुक्रमे दहिगाव, नांदुरा बुद्रूक, मोमीनाबाद, पलसोडा, रामपूर येथील नागरी सुविधा तथा नवीन गावठाणाच्या भूसंपादनाची कामे ९८ टक्के ते ८० टक्क्या दरम्यान पूर्ण झाली आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प