शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

जिगाव प्रकल्पामध्ये तीन वर्षात अंशत: पाणी साठविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:09 IST

जिगाव प्रकल्पामध्ये ३२ गावे पूर्णत: आणि १५ गावे अंशत: बाधीत होत आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या २२ वर्षापासून जिगाव प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पामुळे होणारे लाभ प्रत्यक्षात मिळण्याच्या दृष्टीकोणातून येत्या तीन वर्षात समान पातळीवर पुनर्वसन, पाणी अडविणे आणि प्रत्यक्ष सिंचनाचा शेतकऱ्यांना लाभ देणे या त्रिसुत्रीला अनुसरून जिगाव प्रकल्पाला गती देण्याची भूमिका शासनस्तरावर घेण्यात आली आहे.त्यानुषंगानेच सिंचन अनुशेष कार्यक्रमासह ‘बळीराजा’ योजनेत समाविष्ट असलेल्या जिगाव प्रकल्पाला पुढील तीन वर्षात चार हजार कोटी रुपये उपलब्ध करण्यासाठी राज्यपालांच्या निधी वाटपाच्या सुत्रा व्यतिरिक्त विशेष तरतूद म्हणून निधी उपलब्ध करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुढाकार घेतला आहे. सहा आॅगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत यासंदर्भात मुंबईतील बैठकीत चर्चा झाली. प्रकल्प उभारणीचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या पदरात पडण्यासाठीच पहिल्या टप्प्यातील २२ गावांचे पुनर्वसन, अंशत: पाणी साठवून ४१ हजार हेक्टरवर सिंचनचा पहिल्या टप्प्यात लाभ देणे आणि उपसा सिंचन योजना कार्यान्वीत करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यानुषंगानेच जिगाव प्रकल्पावर अतिरिक्त सांडवा निर्माण करून प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे बाधीत होणाºया ९० किमी परिसरातील संभाव्य बाधीत गावठाणांचे पूनर्वसन टाळण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. जिगाव प्रकल्पामध्ये ३२ गावे पूर्णत: आणि १५ गावे अंशत: बाधीत होत आहे. या व्यतिरिक्त जिगाव प्रकल्पाचे बॅक वॉटर हे जवळपास ९० किमी परिसरात विखूरणार आहे. त्यानुषंगाने काही भागातील जमीन बाधीत होण्याची शक्यता पाहता अतिरिक्त सांडवा निर्माण करून आर्थिक बचतीसोबतच सिंचनाचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे.

दीड हजार कोटी रुपायांनी शेती उत्पन्न वाढणारपुनर्वसन, सिंचन व प्रकल्पाची कामे समान पातळीवर करत प्रकल्पात अंशत: पाणीसाठवून ४१ हजार हेक्टरवर सिंचनाचा लाभ दिल्यागेल्यानंतर परिसरातील शेतीतून दीड हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज असून अल्पावधीतच त्याचे लाभ खारपाणपट्यात मिळू शकतात, असा अंदाज प्रशासकीय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात टप्प्या टप्प्यात ही कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचा विचार आहे. अन्यथा २०३५ पर्यंत कामाची व्याप्ती संपणार नाही, असेही एका अधिकाºयाने सांगितले.

पुनर्वसनाच्या कामांवर जोरजिगाव प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्प्यातील २२ गावांचे पुनर्वसन उपलब्ध निधीतून करण्यात येणार असून तीन वर्षात ते मार्गी लावण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठीच चार हजार कोटींच्या निधीसाठी विशेष तरतूद करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून प्रयत्न सुरू झाले आहे. पुनर्वसित गावठाणातील १४ गावातील कामे आता अंतिम टप्प्यात असून उर्वरित आठ गावांचा प्रश्नही मार्गी लावण्याचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प