शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिगाव प्रकल्प :  सुक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे मिळणार सिंचनासाठी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 16:41 IST

सिंचनास पाणी देण्यासाठी जवळपास सहा हजार ६६१ किमी लांबीच्या जलवाहिन्या (पाईपलाईन) टाकाव्या लागणार आहेत.

- नीलेश जोशीबुलडाणा: जिगाव प्रकल्पातंर्गत शेती सिंचनासाठी सुक्ष्म सिंचन प्रणालीद्वारेच पाणी उपलब्ध करण्यात येणार असून २००८ नंतर वाल्मी (वॉटर अ‍ॅन्ड लॅन्ड मॅनेजमेंट इन्स्टीट्यूट, औरंगाबाद) यांनी केलेला अभ्यास व मध्यंतरी गठीत करण्यात आलेल्या चितळे समितीने प्रकल्पाच्या फेरनियोजनासंदर्भात दिलेल्या अहवालानंतरच याबाबीचा प्रकल्पातंर्गत अंतर्भाव करण्यात आला आहे. दरम्यान,  नऊ सप्टेंबर २०१९ ला प्रकल्पाच्या १३ हजार ७४८ कोटी रुपयाच्या तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता देतानांच ही अट टाकून त्यास अंतिम मान्यता देण्यात आली आहे.प्रकल्पातंर्गतच्या १२ उपचास सिंचन योजनेतून कालव्याद्वारे जर एक लाख १६ हजार ५७० हेक्टरवर पाणी देण्याचा खर्च हा वर्षाकाठी ५० ते ६० कोटी रुपयांच्या घरात जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय जलआयोगाने प्रकल्पाला मान्यता देताना प्रकल्पावरून होणाºया सिंचनासाठी सुक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर करण्याबाबत अट घातली होती. दरम्यान, त्यासंदर्भाने पर्यावरणीय अभ्यासही करण्यात आला असून सुक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे शेती सिंचनास पाणी देण्यासाठी जवळपास सहा हजार ६६१ किमी लांबीच्या जलवाहिन्या (पाईपलाईन) टाकाव्या लागणार आहेत.जिगाव प्रकल्पातंर्गतच्या लाभ क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्र हे खारपाणपट्यात येते तर उर्वरित ५० टक्के क्षेत्रापैकी बहुतांश भाग हा अवर्षण प्रवण आहे. प्रामुख्याने खामगाव तालुक्यातील पट्टा यात आहे. परिणामी कालव्याद्वारे पाणी दिल्या गेल्यास जमीनीचे खारपण वाढण्यासोबतच पाण्याचा अपव्यय होण्याची भिती होती. त्यामुळे जमीन अकृषक होऊन तिला पूर्वस्थिती आणण्यासाठीचा खर्चही अधिक येऊन येथे विविध पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले असते. त्या पार्श्वभूमीवर वाल्मी संस्थेला निमंत्रीत करून या भागातील पिक पद्धती, येथे कोणती पिके घेतल्या जावू शकतात व पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर कोणती पिके येथे घेतल्या जावू शकतात. याचा अभ्यास करण्यात येऊन सुक्ष्म सिंचन प्रणालीतंर्गतच शेती सिंचन या प्रकल्पातंर्गत अंतर्भूत करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प