संग्रामपूर (जि. बुलडाणा) : आर्मी कॅम्पमध्ये पुणे येथे कार्यरत असलेल्या कवठळ या गावातील जवानाचा मेंदुच्या आजाराने उपचारा दरम्यान पुणे येथे १५ एप्रिल रोजी मृत्यू झाला. कवठळ येथील प्रदीप भिकाजी भामद्रे हा पुणे येथील आर्मी कॅम्पमध्ये सन २00७ पासून कार्यर त होता. त्याला ब्रेन ट्युमर झाल्यामुळे त्याच्यावर गत वर्षात चार वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती; परंतु त्याची १५ एप्रिल रोजी प्रकृती खालावल्यामुळे दुपारी २ वाजेदरम्यान पुणे येथील रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्याचे पार्थिव शनिवारी कवठळ येथे आणल्यावर दुपारी १ वाज ता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जवानाचा मेंदुच्या आजाराने मृत्यू!
By admin | Updated: April 17, 2016 01:11 IST