शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व विधेयकविरोधात जमीअत उलेमा-ए-हिंदचा निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 17:50 IST

धेयक घटनाविरोधी असल्याने ताबडतोब मागे घेण्याची मागणी जमीअत उलेमा-ए-हिंद च्या वतीने करण्यात आली आहे. 

संग्रामपूर: शेजारी देशांमधील शरणार्थींना धर्माच्या आधारे आपल्या देशामध्ये स्थान देण्यासाठी केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व विधेयक मंजूर करून त्यावर शिक्का मोर्तब केला असला तरी सदर विधेयक घटनाविरोधी असल्याने ताबडतोब मागे घेण्याची मागणी जमीअत उलेमा-ए-हिंद च्या वतीने करण्यात आली आहे. शुक्रवारी रोजी नागरिकत्व विधेयक विरोधात संग्रामपूर येथील जामा मस्जीत पासून तहसील पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. शांततेच्या मार्गाने हा मोर्चा तहसीलवर धडकला. तहसीलदार संग्रामपूर यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या निषेध मोर्चात शेकडोंच्या संख्येने मुस्लिम समाजा सह इतर धर्मियांचीही उपस्थिती होती. नुकतेच राज्यसभेत केंद्र सरकारने नागरिकत्व विधेयक मंजूर केले. मात्र सदर विधेयक वादग्रस्त असल्याने जमियत उलेमा ए हिंद संघटना आक्रमक झाली. भारतीय संविधानात अनुच्छेद 14 व 15 नुसार कायद्यात भारतीय नागरिकांना समान अधिकार दिले आहेत. तसेच राज्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीला कायद्यानुसार जात, धर्म, पंत यापासून भेदभाव करण्यास रोखण्यात आले असतानासुद्धा शासनाने धर्मावर आधारित विधेयक पारित करून घटना विरोधी कायदा लागू करण्याचा हट्ट धरला. असंवैधानिक घटनाविरोधी विधेयक असल्यामुळे लागू करण्यात येऊ नये अशी मागणी जमियत उलेमा ए हिंद या संघटनेकडून करण्यात आली. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर विधेयक धर्मावर आधारित असून भारतीय संविधान विरोधात असल्याने महामहीम राष्ट्रपतींनी याकडे लक्ष देऊन हे विधेयक रद्द करावे अशी मागणी निवेदनातून राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे. या निषेध मोर्चामध्ये मौलाना महेमूद, मुफ्ती समी, जकाउल्ला मौलाना, मौलाना जाफर, मौलाना शकील, शेख अफसर, मौलाना इरफान, अभय मारोडे, श्याम डाबरे, श्रीकृष्ण गावंडे, जावेद अली, मुशीर अली, शेख अफरोज, मौलाना आरिफ आदींचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक