शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभाग करणार जलजागृती, बुलडाणा जिल्ह्यात जलजागृती सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:58 IST

बुलडाणा : २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यात बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ व पाटबंधारे विभागांतर्गत १६ ते २२ मार्च या कालावधीत जल जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाकडून जल जागृती करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देजल साक्षरतेविषयी होणार प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यात बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ व पाटबंधारे विभागांतर्गत १६ ते २२ मार्च या कालावधीत जल जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाकडून जल जागृती करण्यात येणार आहे. वातावरणातील बदलामुळे गेल्या काही काळापासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पाणी टंचाईचे संकट उभे आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि त्याच्या वापराबाबत जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यााठी २२ मार्च या जागतिक जल दिनानिमित्त राज्य शासनामार्फत १६ ते २२ मार्च या कालावधीत जल जागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जागतिक जल दिनानिमित्त बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ व पाटबंधारे विभागांतर्गत १६ मार्चपासून जल जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये पाण्याचे महत्त्व लोकांना पटवून दिले जाणार असून, जल साक्षरतेसाठी पाण्याचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पाण्याचे प्रदूषण रोखणे याबाबत सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जलसंपदा विभागामार्फत विशेष कार्यक्रम राबविला जाणार असून, सप्ताह कालावधीत कृषी, पाणी पुरवठा, उद्योग, पर्यावरण, ग्रामविकास, नगरविकास, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, उच्च व तंत्रशिक्षण या विभागामार्फत जल जागृतीचे विविध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. घरगुती पाणी वापराबाबत बचतीचे उपाय, वितरण व्यवस्थेतील पाणी नाश टाळण्यासाठी उपाय, टंचाई भागात पाणी पुरवठ्याची व्यवस्था, ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याची व्यवस्था व तेथील यंत्रणा कार्यक्षम ठेवण्यासाठी घ्यावयाची काळजी, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत जागृती करण्यात येणार आहे. 

जल साक्षरतेविषयी होणार प्रबोधन जिल्ह्यात १६ ते २२ मार्च या कालावधीत होणाºया जल जागृती सप्ताहादरम्यान जल जागृती करणारी कार्यशाळा, व्याख्यान, जलदिंडी, वक्तृ त्व, रांगोळी, निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील विविध नद्यांमधील पाण्याचे कलश पूजन करून व जलप्रतिज्ञा करण्यात येणार आहे. वॉटर रन, चित्रकला व वक्तृ त्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाºया स्पर्धकांना बक्षीस देण्यात येणार आहे.   

टॅग्स :buldhanaबुलडाणा