शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’साठी जैन संघटनेचा पुढाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:54 IST

मेहकर: बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृश परिस्थितीचा  सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहून जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  यासाठी स्थानिक जैन स्थानकामध्ये  रविवारला नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून, ३ मार्चपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्दे३ मार्चपासून राबविणार उपक्रम दुष्काळावर मात करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृश परिस्थितीचा  सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहून जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  यासाठी स्थानिक जैन स्थानकामध्ये  रविवारला नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून, ३ मार्चपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी-अधिक होऊन अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिकांच्या उत्पादनावरसुद्धा याचा परिणाम जाणवत आहे.  पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे  पावसाळ्यात पडणार्‍या पाण्याची साठवणूक व्हावी, सर्वसामान्य  जनतेसह   शेतकर्‍यांना  याचा फायदा व्हावा, यासाठी भारतीय जैन संघटना, पुणे यांच्यावतीने ३ मार्च पासून संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात जलयुक्त शिवार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गाळ उपसा, नाले, बंधारे, तलाव, धरण यांचे खोलीकरण करणे, उपसलेला गाळ शेतकर्‍यांच्या शेतामध्ये टाकणे यासह इतरही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा यांच्या प्रेरणेने या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जैन संघटनेकडून १३४ जेसीबी, पोकलॅड यासह इतरही यंत्रसामग्री देण्यात येणार आहे. हा उपक्रम भारतीय जैन संघटनेचे सर्व समाजबांधव शासकीय अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक यांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. ३ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाची बुलडाणा जिल्ह्यात सुरुवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांची  उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमामुळे बुलडाणा जिल्हय़ातील ज्या गावात पाणीटंचाई आहे, अथवा ज्या गावात बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा होतो, अशा गावातील  पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे.  यासाठी  जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर समिती नेमून त्या समितीच्या माध्यमातून हा उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहे.  यावेळी बुलडाणा येथील राजेश देशलहरा, मुन्नाजी बेगाणी, गादिया, अक्षय देशलहरा यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन जयचंद बाठिया यानी केले, तर आभार  नीलेश नाहाटा यांनी केले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार