शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

लोकसहभागाशिवाय समृध्द गावाची कल्पना अशक्य- डॉ.अविनाश पोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 4:22 PM

लोकसहभागाशिवाय समृद्ध गावाची कल्पना अशक्य असल्याचे मत डॉ.अविनाश पोळ यांनी व्यक्त केले.

- नविन मोदे लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : पाण्याचा डॉक्टर म्हणून ज्यांची जनसामान्यांत ओळख आहे. सुमारे २० वर्षापासून ज्यांनी ग्रामस्वच्छता व जलसंधारणाच्या कार्यासाठी वाहून घेतले, असे डॉ. अविनाश पोळ. अमिर खान यांच्या पानी फाऊंडेशनचे विश्वस्त, राष्टÑपतींच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त डॉ.अविनाश पोळ हे पानी फाऊंडेशनच्या कामानिमित्त मोताळा तालुक्यामध्ये आले होते त्यावेळी त्यांचेशी संवाद साधला असता, लोकसहभागाशिवाय समृद्ध गावाची कल्पना अशक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मागील चार वर्षाचा पानी फाऊंडेशनचा प्रवास या टप्प्यावर त्याच्या यश-अपयशाकडे कसे बघता?समाधानी आहे. दरम्यान, लोक एकत्र आले. लोकसहभागातून प्रचंड कामे झाली. मोताळा तालुक्यातील शेतकऱ्याने आयुष्यात प्रथमच रब्बीचे पिक घेतल्याचे सांगितले. प्रत्यक्ष बांधावर जाऊन गहु बघितला हेच या संघर्षाचे मोठे फलीत आहे.

समृध्द गाव स्पर्धेचा उद्देश काय?वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेकडो गावांनी आपआपल्या गावामध्ये पाणी साठवण्याची क्षमता वाढविली. परंतु यापैकी अनेक गावात पाण्याची उपलब्धता वाढल्याने जास्तीत जास्त पाणी लागणाºया पिकाचे क्षेत्र काढले. त्यामुळे सामुहिक जलव्यवस्थापन या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

समृध्द गाव स्पर्धेसाठी प्रामुख्याने कोणती कामे अपेक्षित आहेत?मृद व जलसंधारण, जलव्यवस्थापन, वृक्ष व जंगलाची लागवड व वाढ करणे कुरणक्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य व पोत सुधारणे व स्वयंरोजगार निर्मिती यातून समृध्द गावाची निर्मिती व शाश्वत विकास होण्यास मदत होईल. यादृष्टीने वाटचाल महत्त्वाची आहे.

पाणी फाऊंडेशनच्या कामात लोकसहभाग किती महत्वाचा?लोकसहभागाच्या माध्यमातून सामुहीक लोकचळवळ निर्माण करून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास हेच पाणी फाऊंडेशनच्या कामाचे सुत्र आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग समृध्द गावासाठी महत्वाचा आहे. एखाद्या चळवळीत लोकांना सामावून घेणे, लोकांना बदलने हे निश्चितच सोपे नाही; परंतु लोक बदलतात, याचा अनुभव या मोहिमेदरम्यान चांगलाच आला. गरज असते त्यांना विश्वासात घेण्याची समाधानाची. या कार्यक्रमामध्ये युवक स्वत: पुढे येत आहे. मानसिकता बदलली की प्रश्न अनुत्तरीत राहतच नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत