शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव रेल्वेस्थानकाला 'आयएसओ' मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:55 IST

शेगावसह मलकापूर रेल्वे स्टेशन ला आय एस ओ मानांकन प्राप्त झाले आहे.

- अनिल उंबरकार लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावसह मलकापूर रेल्वे स्टेशन ला आय एस ओ मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे बुलडाणा जिल्हयाचा सन्मानात वाढ झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव हे संत गजानन महाराज समाधी मंदिरामुळे सर्वत्र प्रसिध्द आहे. श्रीं चे दर्शनासाठी दररोज असंख्य भाविक येतात. असंख्य भाविक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे यात्रेकरूच्या माध्यमातून शेगाव रेल्वे स्टेशन ला चांगले उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळेच शेगाव रेल्वे स्टेशनला ‘अ’ दर्जा प्राप्त झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून स्वच्छता अभियान यशस्वी रित्या राबविले. रेल्वे स्टेशन वर नियमित स्वच्छतेला महत्व दिल्या गेले. सोबतच प्रवाशांसाठी विविध सोयी सुविधा मिळवून देण्यावर स्टेशन प्रशासनाकडून नियमितपणे भर दिल्या जात आहे. स्टेशन परिसरात नियमित साफसफाई मुळे स्टेशन निटनेटके स्वच्छ व सुंदर दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांनाकडून रेल्वे प्रशासनाचे कौतुक होत आहे. मागील आठवड्यात स्टेशन परिसराची आय. एस. ओ मानांकनाबद्दल संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाच्या टीम ने भेट देवून पाहणी केली. तसेच विदर्भ प्रवेशद्वार मलकापूर रेल्वे स्टेशन ला सुध्दा आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. सर्वांच्या सहकार्याने रेल्वे स्टेशनला निटनेटकेपणा आला आहे. रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी यांचाही चांगले योगदान आहे. रेल्वे प्रशासनाकडून विविध सोयी सुविधा प्राप्त करून देण्यात येत असल्याने आनंद असल्याची प्रतिक्रिया स्टेशन प्रबंधक पी एम पुंडकर यांनी दिली. नगराध्यक्षा शकुंतला बुच यांनी सुद्धा समाधान व्यक्त केले असून रेल्वे कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली आहे.

मलकापूर व शेगाव रेल्वे स्टेशन ला आय एस ओ मानांकन प्राप्त झाले आहे. ही बुलडाणा जिल्ह्यातील जनतेसाठी गौरवास्पद बाब आहे.- ना.डॉ.संजय कुटे,पालकमंत्री

टॅग्स :Shegaonशेगावrailwayरेल्वेbuldhanaबुलडाणाMalkapurमलकापूर