शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सिंचन अनुशेषासोबतच कर्मचाऱ्यांचाही अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:40 IST

एकीकडे सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी कर्मचाºयांचा अनुशेष भरून काढण्यासंदर्भातील कार्यवाही थंड बस्त्यात आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एकीकडे जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मोठा असताना पाटबंधारे विभागांतर्गत प्रत्यक्ष जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी राबणाºया कर्मचाऱ्यांचाही अनुशेष असल्याचे वास्तव आहे. एकीकडे सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी कर्मचाºयांचा अनुशेष भरून काढण्यासंदर्भातील कार्यवाही थंड बस्त्यात आहे.गेल्या सात वर्षांपासून हीच परिस्थिती कायम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थापित सिंचन क्षमतेचाही पूर्ण कार्यक्षमतेने वापर करण्यात अडचणी आहेत. परिणामी, जिल्ह्यातील तीन मोठ्या, सहा मध्यम व ८१ लघु प्रकल्पावरील कालवे, पाट आणि सºयांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न मात्र कायम आहे. विशेष म्हणजे अवघे ५७ कर्मचारी ७५३ किमी लांबीच्या या मुख्य कालव्यांसोबतच अंतर्गत पाट आणि सºयांची देखभाल करत आहे. शेती सिंचनाची महत्त्वाची जबाबदारी असलेला हा सिंचन विभागाच कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे एक प्रकारे कोरडा पडल्याचे चित्र आहे.मुळात बुलडाणा पाटबंधारे विभागात आकृतीबंधानुसार जेथे ४९० कर्मचारी हवे आहे तेथे प्रत्यक्षात २१८ कर्मचारी कार्यरत आहेत तर तब्बल २७२ कर्मचाºयांचा अनुशेष असल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने प्रत्यक्ष सिंचन करण्यासाठी कालवा निरीक्षक, मोजणीदार, कालवा टपाली आणि कालवा चौकीदार या कर्मचाºयांची महत्त्वाची भूमिका राहते; मात्र हीच पदे रिक्त असल्याने स्थापित सिंचन क्षमतेचाही जिल्ह्यात वापर होत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी जिगाव प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी जोर लावण्यात येत आहे. तर प्रत्यक्षात सिंचनासाठी पाणी उपलब्ध असतानाही त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे चित्र आहे.आॅक्टोबर महिन्यात पाणी आरक्षण समितीची बैठक होत आहे. त्यात सिंचनासाठी तथा पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात येईल. ही बैठक वेळेत होईलही; पण प्रत्यक्षात शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्यानंतर ज्या कालवे, पाट आणि सºयांद्वारे ते दिले जाईल, त्याच दुरुस्त झालेल्या नसतील तर उपलब्ध पाण्याचा काय उपयोग? त्यामुळे रिक्तपदे भरण्याची गरज आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प