शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

गुंतवणूकदारांची फसवणूक : पतसंस्थेचे फरार अध्यक्ष, व्यवस्थापकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 14:51 IST

पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गणपत खरात व व्यवस्थापक गणेश कचरुजी खंडागळे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० जानेवारी रोजी औरंगाबाद येथून अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/चिखली : खोटे व बनावट कॅश प्रकरणे तयार करुन ठेवीदारांची १ कोटी ४७ लाख रुपयांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेले चिखली येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गणपत खरात व व्यवस्थापक गणेश कचरुजी खंडागळे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० जानेवारी रोजी औरंगाबाद येथून अटक केली. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.खोटे व बनावट कॅश कर्ज प्रकरणे तयार करुन स्वत:च्या फायद्यासाठी ठेवीदारांच्या पैशातून १ कोटी ४७ लाख २० हजार ३२९ रुपयांची उचल करुन अपहार केल्याचा गुन्हा चिखली पोलिस स्टेशनमध्ये १२ जुलै २०१९ रोजी दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अध्यक्ष दत्तात्रय गणपत खरात (रा. राऊतवाडी चिखली), व्यवस्थापक सतीश प्रल्हाद वाघ, रोखपाल परमेश्वर सुखदेव पवार, राऊतवाडी शाखा व्यवस्थापक गणेश कचरुजी खंडागळे यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुलडाणा येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास हस्तांतरित झाला. आजपर्यंत केलेल्या तपासाअंती उपरोक्त आरोपींनी ४ कोटी ३४ लाख ५८ हजार ८८ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून चारही आरोपी फरार होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी संस्थेचे व्यवस्थापक सतीश वाघ व रोखपाल परमेश्वर पवार यांना अटक केली आहे. मात्र उर्वरित दोघे फरार होते.संस्थाध्यक्ष दत्तात्रय खरात व गणेश खंडागळे औरंगाबाद परिसरात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखा बुलडाणाचे पोलिस उपअधिक्षक डी. बी. तडवी यांना मिळाली. त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना विशेष व अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले असता २५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दिगंबर अंभोरे करीत आहेत. पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक संदीप पखाले यांच्या नेतृत्वात पोलिस उपअधिक्षक डी. बी. तडवी, पो.उपनिरीक्षक दिगंबर अंभोरे, रामु मुंढे, सरदार बेग, गजानन जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी