शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजात साकारतेय अद्यावत संग्रहालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 16:18 IST

सिंदखेडराजा : जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थान सिंदखेडराजा येथे जिल्ह्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे अद्यावत संग्रहालय साकार होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थान सिंदखेडराजा येथे जिल्ह्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे अद्यावत संग्रहालय साकार होत आहे. संग्रहालयाला अनुसरून असलेली संग्रहालयाची नवीन इमारत याठिकाणी २०१८ मध्ये बांधुन पुर्ण झाली आहे. ही इमारत सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा यांनी बांधली आहे.या बांधकामावर ३.३७ कोटी रुपये खर्च आला असून, संग्रहालयाच्या नवीन इमारतीमध्ये प्रदर्शनाचे चार प्रशस्त दालने असल्याची माहिती १८ मे रोजी असलेल्या जागतिक संग्रहालय दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आली.यामध्ये प्रथम दालनात सिंदखेडराजा व जिल्ह्यात असलेल्या पाषाण मुर्त्या व इतर पाषाण कलाकृतींचे दर्शन राहणार आहे. दुसऱ्या दालनात शस्त्र तोफा इत्यादीचे प्रदर्शन राहणार आहे. सोबतच या शस्त्रांची मराठी व इंग्रजीमध्ये माहितीसुध्दा लिहीली जाणार आहे. तिसºया प्रदर्शन दालनात माँ साहेब जिजाऊ यांच्या जिवनातील महत्वपुर्ण घटनांशी संबंधित चित्रकलाकृतीचे प्रदर्शन राहणार आहे. चौथ्या दालनात कलावस्तु ऐतिहासिक नाणे, ऐतिहासिक अभिलेख आदी वस्तु राहणार आहे. संग्रहालय इमारतीमध्ये मिनीथीएटरची व्यवस्था केली असून या थिएटरव्दारा छत्रपती शिवाजी महाराज, सिंदखेडकर जाधव यांच्या इतिहासावर लहान लहान क्लीप्स प्रेक्षकांना दाखवण्यात येईल. याशिवाय विविध ऐतिहासिक माहिती उपलब्ध राहणार आहे. संग्रहालय इमारतीमध्ये ग्रंथालय व वाचन कक्ष इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे. इतिहास संशोधक, विद्यार्थी या ग्रंथालयाचा लाभ घेऊ शकतील.ऐतिहासिक पुस्तके, कलावस्तुंच्या प्रतिकृती, पारंपारिक कलावस्तु आदी साहित्य या ठिकाणी प्रेक्षकांसाठी विक्रीला उपलब्ध असेल. दुरून येणारा प्रेक्षक संग्रहालय पाहून झाल्यावर त्याला थोडी विश्रांती मिळावी याची व्यवस्था राहणार आहे. प्रदर्शनाचा साडेतीन कोटींचा प्रस्ताव संग्रहालयाच्या पायºया चढण्यास जेष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये, दिव्यांगांना सुलभ जाणेयेणे व्हावे याकरीता त्यांच्या सेवेला संग्रहालय इमारतीत लिफ्टची सुविधा केली आहे. तसेच व्हीलचेअर सुध्दा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय प्रेक्षकांसाठी सौंदर्यप्रसाधनगृह, पिण्याचे पाणी बाहेर परिसरात अल्पविश्रांती घेण्यास लॉन या सुविधा सुध्दा संग्रहालय परिसरात करण्यात येणार आहे.४सिंदखेडराजा येथील संग्रहालय जनतेसाठी लवकर सुरू व्हावे याकरीता प्रदर्शन व्यवस्थेचा ३ कोटी ५७ लाखाचा प्रस्ताव तयार करून तो पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभाग, मुंबई यांना सादर केला आहे. निधी मिळण्याचे अपेक्षित आहे. सिंदखेडराजा येथील शासकीय संग्रहालय हे इतिहास संशोधन, पर्यटन इत्यादीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण राहणार असून सिंदखेडराजा नगराचे ते भूषण राहील यात शंका नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजा