डोणगाव : झाेपेच्या गाेळ्या, खाेकल्याच्या औषधींनी नशा करण्याचा प्रकार डाेणगाव परिसरात वाढला आहे. दारू, गांजा किंवा इतर साहित्याचा वापर केल्यास त्याची माहिती कुटुंबीयांना माहिती हाेण्याची भीती असते. त्यामुळे, युवक इतर मार्गाचा अवलंब करीत असल्याचे चित्र डाेणगाव परिसरात आहे.
डाेणगाव येथे वैद्यकीय कचऱ्यात खाेकल्यावरील औषधांच्या बाॅटल आढळल्या हाेत्या. खोकल्याची कोडीन फोस्पेट युक्त औषध ही ‘चिप्पा’ या सांकेतिक नावाने या औषधी एका कॉलवर मिळत असल्याचे चित्र आहे. परिसरात मागील काही वर्षांत युवा वर्गात औषधीपासून नशा करण्याचे व्यसन जडले. ही नशेची औषधं सुद्धा त्यांना मुबलक प्रमाणात व फक्त एका कॉलवर मिळते. घरच्यांना सुद्धा नशा करत असल्याचा थांग पत्ता लागत नाही . कारण त्यांचा वास येत नाही. तसेच विचित्र हालचाली हाेत नाहीत. त्यामुळे युवा वर्गात औषधींपासून होणारा नशा लोकप्रिय होत आहे. कोठूनही कॉल केल्यावर कोणालाही समजणार नाही यासाठी अवैध गोळ्या विक्रेत्यांनी त्यांचे सांकेतिक नाव ठेवले आहेत. त्यात नशेच्या गोळ्यांना बटन तर कोडीन फोस्पेट युक्त औषधींच्या बाटलीला ‘चिप्पा’ असे संबोधले जाते. ज्याने समोरचा व्यक्ती काय मागत आहे याचा थांग पत्ता लागत नाही. नशेची औषधींचा व्यसन जडल्यावर ते साेडणे खूप अवघड असते. या औषधीचे दुष्परिणाम सरळ मूत्रपिंड व सदुपिंडवर हाेत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या औषधींचा नशा बंद केल्यावर निद्रानाश, भूख न लागणे, चिडचिडेपणा असे अनेक व्याधी जडतात. त्यामुळे प्रशासनाने डोणगावमध्ये वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.