शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 16:44 IST

लक्षांक मिळाला नसल्याने शेतकºयांच्या अर्जांवर निर्णय झाला नसल्याचे कळते.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी विविध लाभासाठी अर्ज केलेल्या शेतकºयांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. लक्षांक मिळाला नसल्याने शेतकºयांच्या अर्जांवर निर्णय झाला नसल्याचे कळते.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०१९-२०२० या वर्षासाठी खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अनेक शेतकºयांनी अर्ज केले. यात कांदाचाळ, शेडनेट, शेततळे अस्तरीकरणासाठी शेतकºयांनी अर्ज केले. एससी, एसटी या प्रवर्गासाठी असलेल्या या योजनेंतर्गत १ लाख ६० हजार रूपये किंमतीच्या कांदा चाळीसाठी ८६ हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. १० गुंठे जमिनीवर साडेचार लाख रूपयांचे शेडनेट देण्यात येणार असून यासाठी २ लाख २५ हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे.शेततळे अस्तरीकरणासाठीही ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. गत वर्षात नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान अनेक शेतकºयांनी अर्ज केले. दरम्यान या सर्वच योजनांसाठी अद्याप लक्षांक आलेला नसल्याने अद्याप पुढील कार्यवाही होऊ शकलेली नाही.चालु वर्षात गत २ फेब्रुवारी पासून पुन्हा अर्ज घेण्यात सुरूवात करण्यात आली. ७ फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ६ फेब्रुवारी पर्यंत कांदाचाळीसाठी १०, शेडनेटसाठी ३ तर शेततळे अस्तरीकरणासाठी एका शेतकºयाने अर्ज केला असल्याची माहिती मिळाली. 

लक्षांक आल्यानंतर होईल निवड !योजनानिहाय शेतकºयांचा लक्षांक अद्याप प्राप्त झालेला नसल्याने शेतकºयांच्या निवडीबाबतचा प्रश्न प्रलंबित आहे. लक्षांक प्राप्त झाल्यानंतर मिळालेला लक्षांक व आलेल्या अर्जांची संख्या याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी