शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३५७ नगर पालिका कर्मचाऱ्यांना  विमा कवच, सानुग्रह अनुदान लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 18:06 IST

राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना अखेर राज्य शासनाने विमा कवच आणि सहाय्यय सानुग्रह अनुदान लागू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोविड-१९ या विषाणूसंसर्गाच्या आपातकालीन परिस्थितीत लढणाºया राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना अखेर राज्य शासनाने विमा कवच आणि सहाय्यय सानुग्रह अनुदान लागू केले आहे. परिणामी, राज्यातील तब्बल ३५७ नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यात १४ मार्चपासून कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर  डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार, महसूल कर्मचारी आपआपल्या परीने कोरोना योध्दे म्हणून लढताहेत. या कालावधीत महसूल, ग्रामविकास आणि आरोग्य कर्मचाºयांना सुरूवातीलाच विमा कवच दिले होते. उपरोक्त कर्मचाºयांच्या  सोबत सेवारत राहूनही पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे विमा कवच आणि सानुग्रह अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटनेने टप्प्या-टप्प्याने आंदोलन उभे केले. सुरूवातीला निवेदन, काळ्या फिती आंदोलन करूनही  न्याय न मिळाल्याने संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. शासनाचा कर्मचाºयाप्रती दूजाभाव कायम असल्याने कोविड-१९ या आपातकालीन परिस्थिती मुख्यमंत्री सहायता निधीला एक दिवसाचे वेतन देण्यासही पालिका कर्मचाºयांनी नकार दर्शविला. दरम्यान, तब्बल अडीच महिन्यानंतर राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना २९ मे रोजी विमा कवच आणि सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उशीरा का होईना राज्यातील पालिका कर्मचाºयांना न्याय मिळाल्याचे दिसून येते.

 राज्यातील २५ हजारावर सफाई कामगारांना न्याय!कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाºया कर्मचाºयांना विमा कवच/ सानुग्रह सहाय्य अनुदान लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाने अपर मुख्यसचिव (वित्त) यांच्या स्वाक्षरीने २९ मे रोजी अद्यादेश जारी केला आहे. यामध्ये नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाचा राज्यातील २५ हजार सफाई कामगारांसोबतच हजारो कामगारांना होणार आहे.

 नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना विमा कवच आणि सानुग्रह अनुदान देण्यासाठी संघटनेने सुरूवातीपासूनच लढा दिला. या लढ्यात सुरूवातीपासूनच ‘लोकमत’चे योगदान महत्वाचे राहीले. संघटनेच्या रेट्यापुढे शासनाने ‘देर आये दुरूस्त आये’ या न्यायाने पालिका कर्मचाºयांना न्याय दिला आहे.- विश्वनाथ घुगेअध्यक्ष,महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटना.

टॅग्स :khamgaonखामगावEmployeeकर्मचारी