शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बैलांना विम्याचे कवच; शेतकरी अनभिज्ञ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 18:00 IST

बुलडाणा: पशुपालकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाचा विमा उतरविण्यात येतो; त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला सुमारे पाच हजार जनावरांचा विमा उतरविण्याचे लक्ष दिलेले आहे.

ठळक मुद्देबोटावर मोजण्या इतक्याच शेतकºयांना या विम्याविषयी माहिती असल्याचे दिसून आले. पशुधन विमा योजनेची जनजागृती नसल्याचे चित्र समोर आले आहे. 

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: पशुपालकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाचा विमा उतरविण्यात येतो; त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला सुमारे पाच हजार जनावरांचा विमा उतरविण्याचे लक्ष दिलेले आहे. पोळा सणाच्या पूर्वसंधेला माहिती घेतली असता  या योजनेपासून शेतकरी अनभिज्ञ असल्याने बैलांना विम्याचे कवच नावालाच राहत असल्याचे चित्र दिसून आले. शेतकºयांजवळ असलेली गाय, बैल, म्हैस, देशी व संकरीत दुभती जनावरे, शेळी, मेंढी व इतर पशुधन आकस्मिक तसेच नैसर्गीक संकटाने दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पशुधन दगावल्यास शेतकºयांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाने राष्ट्रीय पशुधन विमा योजना सुरू केली आहे. ही योजना न्यू इंंडिया इन्शुरन्स कंपनी व शासन यांनी सामंजस्य करार करून दारिद्र्य रेषेखालील, बीपीएल, अनुसूचित जाती, जमाती व इतर प्रवर्गातील शेतकºयांना अतिशक कमी दरात पशुंची संख्या व प्रवर्गानुसार रक्कम ठरवून दिल्याने पशुपालकांसाठी ही योजना लाभदायी आहे. २०१६ मध्ये या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला पाच हजार जनावरांचा विमा उतरविण्याचे लक्ष दिले आहे. २०१७-१८ मध्ये पशुधन विमा योजनेसाठी केंद्र शासनाकडून दोन कोटी रुपये व राज्य शासनाचा हिस्सा मिळून तीन कोटी १३ हजार रुपये निधी पशुधन विकास महामंडळाकडे उपलब्ध करून दिला होता.  एक व तीन वर्षाचा पशुधनाचा हा विमा उतरविण्यासाठी पशुपालकांची मात्र उदासिनता दिसून येते. पोळा सणाच्या पूर्वसंधेला काही शेतकºयांना पशुधन विमा योजनेविषयी विचारणा केली असता बोटावर मोजण्या इतक्याच शेतकºयांना या विम्याविषयी माहिती असल्याचे दिसून आले. पशुधन विमा योजनेची जनजागृती नसल्याचे चित्र समोर आले आहे.  

टॅग्स :buldhana bus standबुलडाणा बस स्टॅन्डFarmerशेतकरी