शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन व्यवस्थापनासाठी स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

रिॲलिटी चेक सिंचन व्यवस्थापन घोळ- भाग २ बुलडाणा: कालवा देखभाल दुरुस्तीची प्रकल्पांच्या हस्तांतरणातील वादामुळे जिल्ह्यात मोठी समस्या असताना वर्तमान ...

रिॲलिटी चेक

सिंचन व्यवस्थापन घोळ- भाग २

बुलडाणा: कालवा देखभाल दुरुस्तीची प्रकल्पांच्या हस्तांतरणातील वादामुळे जिल्ह्यात मोठी समस्या असताना वर्तमान स्थितीत जलसंपदा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या बुलडाणा पाटबंधारे विभागासमोर स्थापित सिंचन क्षमता प्रत्यक्षात उपयोगात आणण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणखी एक स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभागाची गरज निर्माण झाली आहे.

बुलडाणा पाटबंधारे विभागांतर्गतच्या सिंचन शाखेंतर्गत तब्बल ९४ प्रकल्प असून, त्यातून शेती सिंचनासोबतच, अैाद्योगिक, पिण्यासाठी पाणी आरक्षित करून त्याचे नियोजन करावे लागते; मात्र त्या तुलनेत येथे मनुष्यबळाचा अभाव आहे. परिणामी, स्थापित सिंचन क्षमता प्रत्यक्षात उतरविण्यास मोठी कसरत या विभागाला करावी लागत आहे. बुलडाणा पाटबंधारे विभागांतर्गत सिंचन व्यवस्थापनासाठी नळगंगा हा एक मोठा, कोराडी, पलढग, मस व ज्ञानगंगा हे मध्य प्रकल्प, ७४ लघू प्रकल्प, सहा उपसा सिंचन योजना, पाच बंधारे व चार कोल्हापुरी बंधारे ज्यामध्ये नियमगाव वायाळ, दुसरबीड, देवखेड आणि तांदूळवाडी या अशा ९४ प्रकल्पांचा समावेश आहे. त्यांची सिंचन क्षमता ५४ हजार ६७७ हेक्टर आहे.

या व्यतिरिक्त बुलडाणा पाटबंधारे विभागाकडे बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळांतर्गत येत असलेले खडकपूर्णा पेनटाकळी हे दोन मोठे, मन, तोरणा, उतावळी हे तीन मध्यम व सहा लघू पाटबंधारे प्रकल्प ज्यामध्ये करडी, मासरूळ, सावखेड भोई, विद्रुपा, ढोरपगाव, ब्राम्हणवाडा यांचा समावेश आहे, असे ११ प्रकल्पही सिंचन व्यवस्थापनासाठी आले आहेत. त्यांची क्षमताही ५४ हजार ७२४५ हेक्टर आहे. त्यामुळे आधीचे ९४ व आताचे ११ बांधकामाधीन असलेले प्रकल्प मिळून तब्बल १०५ प्रकल्प आहेत. त्यांची एकूण निर्मित सिंचन क्षमता ही १,०९,४०२ हेक्टर आहे.

या व्यतिरिक्त लघू पाटबंधारे विभागांतर्गतचे बांधकामाधीन दिग्रस कोल्हापुरी बंधारा, चौंढी बृहत लघू प्रकल्प, आलेवाडी, दुर्गबोरी, निम्म ज्ञानगंगा, बोथा लघू प्रकल्प हे प्रकल्प लवकरच पूर्ण होत आहे. त्यामुळे बुलडाणा पाटबंधारे विभागांतर्गत या प्रकल्पांची संख्या वाढली आहे. परिणामी, उपलब्ध मनुष्यबळ व प्रकल्पांची संख्या पाहता जिल्ह्यात आणखी एक सिंचन व्यवस्थापन विभागाची गरज निर्माण झाली आहे. जेणे करून जिल्ह्यातील सिंचन योग्य पद्धतीने करता येईल. वास्तविक एका विभागांतर्गत ५० हजार हेक्टरपर्यंतचे सिंचन करणे शक्य होते; मात्र येथे त्याच्या दुप्पट भार आला आहे.

प्रस्ताव विचाराधीन

यासंदर्भाने अकोला सिंचन मंडळामार्फत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विशेष प्रकल्प (अमरावती), विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या मार्फत शासन स्तरावर अनुषंगिक प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तो मान्य झाल्यास सिंचन अनुशेषात माघारलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील निर्मित सिंचन क्षमतेचा महत्तम पद्धतीने वापर करणे शक्य होणार आहे. त्यानुषंगाने देऊळगाव मही येथील खडकपूर्णा प्रकल्पाच्या संदर्भाने निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा, इमारत पाहता तेथे असा विभाग निर्माण करणे शक्य आहे. प्रसंगी चिखली येथेही हा विभाग निर्माण केल्या जावू शकतो, असे पाटबंधारे विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.