शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

‘खडकपूर्णा’च्या जलसाठ्यात वाढ; १९ गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 11:40 IST

प्रकल्पामधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून ७०.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील मोठ्या तीन प्रकल्पांपैकी एक असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पामधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून ७०.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. परिणामी नदीकाठच्या १९ गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.गेल्या सात वर्षात हा प्रकल्प तिसऱ्यांचा भरण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तथा मराठवाड्याच्या पट्ट्यात दमदार पाऊस झाल्याने खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सप्टेंबर पुर्वीच प्रकल्पात ७० टक्के जलसाठा झाल्याने सतर्कता म्हणून हा इशारा देण्यात आला आहे.या प्रकल्पाची साठवण क्षमता ९३.४० दलखमी आहे. पाणी पातळी ५२०.५० मिटरवर पोहोचल्यास प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. सध्या प्रकल्पातील जलसाठ्याची पातळी ही ५१९.५० मिटरवर पोहोचली आहे. प्रकल्पात सध्या ६५.४९ दलघमी पाणीसाठा आहे.दरम्यान, प्रकल्पामध्ये प्रसंगी आणखी पाण्याची आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी प्रकल्पाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडकपूर्णा नदीला प्रसंगी मोठा पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रकरणी नदीकाठच्या १९ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सतर्कतेचा इशारा देण्यात आलेल्या गावांमध्ये देऊळगाव राजा तालुक्यातील निमगांव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बु, डिग्रस खु, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, सिंदखेड राजा तालुक्यातील निमगांव वायाळ, साठेगांव, हिवरखेड, राहेरी खु, तडेगांव, राहेरी बु, ताडशिवणी, देवखेड, पिंपळगांव कुंडा, लिंगा आणि लोणार तालुक्यातील खापरखेडा, रायगांव व सावरगांव तेली या गावांचा समावेश आहे. असल्याची माहिती खडकपूर्णा प्रकल्पाच्या सुत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षीही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर