नाफेड अंतर्गत तूर खरेदीची मर्यादा वाढवा! - शिवसंग्रामची कृषीमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:46 PM2018-02-16T13:46:18+5:302018-02-16T13:50:16+5:30

Increase the purchasing of toor under NAFED! | नाफेड अंतर्गत तूर खरेदीची मर्यादा वाढवा! - शिवसंग्रामची कृषीमंत्र्यांकडे मागणी

नाफेड अंतर्गत तूर खरेदीची मर्यादा वाढवा! - शिवसंग्रामची कृषीमंत्र्यांकडे मागणी

Next
ठळक मुद्दे नाफेड तूर खरेदी केंद्रावर शासनाच्या नियमानुसार प्रति हेक्टर ७.५० क्विंटल याप्रमाणे शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्या जात आहे.यावर्षी प्रति हेक्टर तुरीचे १४ ते १५ क्विंटल उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आले आहे.शासनाने नाफेड अंतर्गत सुरु असलेल्या तुर खरेदीची मर्यादा प्रति हेक्टरी १५ क्विंटल पर्यंत वाढवा अशी मागणी आहे.

देऊळगांवराजा : शासना मार्फत नाफेड अंतर्गत सुरु असलेली तूर खरेदीची मर्यादा प्रति हेक्टर १५ क्विंटल पर्यंत वाढविण्यात यावी तसेच देऊळगांव राजा तालुक्यातील गरपिटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ शासना तर्फे मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्यावतीने तहसीलदार दीपक बजाड यांच्या मार्फत कृषि मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या कडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे. राज्यात शासना मार्फत नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरु आहे. नाफेड तूर खरेदी केंद्रावर शासनाच्या नियमानुसार प्रति हेक्टर ७.५० क्विंटल याप्रमाणे शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्या जात आहे. परंतु यावर्षी तुरीचे चांगले पीक आले आहे. प्रति हेक्टर तुरीचे १४ ते १५ क्विंटल उत्पन्न शेतकऱ्यां च्या हाती आले आहे. मात्र शासन प्रति हेक्टर फक्त ७.५० क्विंटल तूर शेतकऱ्यां कडून खरेदी करीत आहे. परिणामी उर्वरित तूर शेतकरी व्यापाºयाला विकत असल्यामुळे व्यापारी मनमानी भावाने तूर खरेदी करत आहे. यामुळे शेतकºयांची आर्थिक पिळवणुक केल्या जात आहे. शासनाने नाफेड अंतर्गत सुरु असलेल्या तुर खरेदीची मर्यादा प्रति हेक्टरी १५ क्विंटल पर्यंत वाढवुन शेतकºयांची आर्थिक पिळवणूक थांबवावी. तसेच देऊळगांव राजा तालुक्यातील भिवगांव, जुमडा, सावखेड भोई, गिरोली बू, पिंपळगांव व इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गारपीट झाल्याने गहु, शाळु, हरभरा तसेच द्राक्ष या पिकांबरोबर शेड नेटचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसंग्रामच्यावतीने करण्यात आली आहे. सदर निवेदनावर शिवसंग्राम तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जहिर खान, शहर अध्यक्ष विनायक अनपट, शहर संघटक श्याम खरात, नासेर मिर्जा, सोनू मिश्रा यांच्या स्वाक्षºया आहे.

Web Title: Increase the purchasing of toor under NAFED!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.