भोसा येथे कोरोना रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:33 AM2021-05-15T04:33:01+5:302021-05-15T04:33:01+5:30

भोसा : येथे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून ...

Increase in the number of corona patients at Bhosa | भोसा येथे कोरोना रुग्णसंख्येत वाढ

भोसा येथे कोरोना रुग्णसंख्येत वाढ

Next

भोसा : येथे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

मेहकर तालुक्यातील भोसा हे आदिवासीबहुल लोकवस्तीचे गाव आहे. भोसा या गावात ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आर.जी. कृपाळ हे एक एक महिना भोसा या गावात येत नसल्याने विकासकामावर परिणाम होत आहे. ग्रामस्थांना अशुध्द पाणीपुरवठा होत असल्याने व भोसा गावात पाणीटंचाई असल्यामुळे शेतातील विहिरीवरून अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. येथे दोघांचा मृत्यू झाला असून १३ मे रोजी सहा रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दोन रुग्णांना मेहकर कोविड सेेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. भोसा गावातील ग्रामपंचायत स्थरावरील ग्रामसमिती ही कागदावरच असून प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही. भोसा गावचे सरपंच व सचिव हे मेहकर येथे वास्तव्यास असल्याने त्यांचे भोसा गावात कधीतरी दर्शन होते. भोसा ग्रामपंचायत शेजारील ग्रामपंचायतमध्ये कोरोना गावातून हद्दपार करण्यासाठी कोविड लसीकरण करण्यात आले आहे, परंतु भोसा ग्रामपंचायतने याकडे दुर्लक्ष केल्याने भोसा गावात कोरोना रुग्णांमध्ये दिवसाला वाढ होत आहे. येथे लसीकरण शिबिर घेण्याची गरज आहे. भोसा ग्रामपंचायतची ग्रामस्तरीय समिती ज्यामध्ये आरोग्य सेवक, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी अशा विविध कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून यापैकी आरोग्य सेवक वगळता कोणताही कर्मचारी हा भोसा गावात फिरकत नाही.

रुग्णालयातही अडचणी

कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी कोविड सेेंटरमध्ये भरती करताना दमछाक होते. दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांची डॉक्टरांच्या अव्वाच्या सव्वा नगदी स्वरूपात पैसे जमा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रुग्णालयांमध्ये पैसे रोख स्वरूपात असल्याशिवाय डॉक्टर कोविड रुग्णांना भरती करत नाहीत.

Web Title: Increase in the number of corona patients at Bhosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.