शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुगाच्या भावात ५ हजारांनी वाढ; १२ हजार रुपये प्रतिक्विंटल मिळतोय दर

By विवेक चांदुरकर | Updated: September 6, 2023 15:49 IST

जून महिन्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्यांना विलंब झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खरीप हंगामात पेरणी केलेल्या मूग व उडदाची काढणी सुरू झाली आहे. बाजार समितीत विक्रीला आणण्यात येत आहे. मुगाच्या भावात गत काही दिवसांत पाच हजार रुपयांनी वाढ झाली असून, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने मुगाची खरेदी करण्यात येत आहे. गत काही दिवसांत मुगाच्या भावात ४ ते ५ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

यावर्षी जून महिन्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्यांना विलंब झाला. मूग व उडदाची पेरणी जून महिन्यात करण्यात येते. यावर्षी पाऊस नसल्याने जिल्ह्यात मुगाची केवळ ३६ टक्के तर उडदाची ३३ टक्केच पेरणी झाली. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाचा खंड पडला. जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये २० दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे पिके सुकली आहेत. काही शेतकऱ्यांनी पीक मोडायला सुरुवात केली आहे. ऐन फुलोऱ्याच्या वेळी पावसाचा खंड पडल्याने उत्पादनात प्रचंड घट येणार आहे. त्यामुळे यावर्षी बाजार समितीत आवक कमी होणार आहे. परिणामी, भाववाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्तवीत आहेत.यावर्षी मुगाची केवळ ३६ टक्के पेरणीजिल्ह्यात मुगाचे सरासरी पेरणीक्षेत्र २० हजार ४०५ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ७ हजार ४१५ हेक्टरवर ३६.३४ टक्केच पेरणी झाली. तसेच उडदाचे सरासरी पेरणीक्षेत्र २२६९७ हेक्टर आहे. त्यापैकी ७५४९ हेक्टरवर ३३.२६ टक्केच पेरणी झाली. संग्रामपूर तालुक्यात १०२६ हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ २७ हेक्टरवर म्हणजे २.६३ टक्केच पेरणी झाली. उडदाचे सरासरी पेरणीक्षेत्र ११६३ हेक्टर असून १५३ हेक्टरवर १३.१५ टक्केच पेरणी झाली आहे.मुगाला दहा हजार ते बारा हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यावर्षी आवक कमी असल्यामुळे भाव वाढले आहे. तसेच आगामी काळातही यावर्षी उत्पादन कमी असल्याने भाववाढ होण्याची शक्यता आहे. सध्या आवक कमी आहे.- मयूर टिबडेवाल, व्यापारी, खामगाव-----------मूगाचे गत सहा दिवसातील दरतारिख भाव (प्रतिव्किंटल)१ सप्टेंबर ९५०१२ सप्टेंबर ७५००४ सप्टेंबर १००००५ सप्टेंबर १२२०१

टॅग्स :Farmerशेतकरी