शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आवक वाढताच तुरीच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 12:06 IST

Agriculture News शनिवारी तुरीला ६२५० रूपये प्रतिक्विंटल भाव होते तर सोमवारी यामध्ये दोनशे रूपयांनी घट झाली आहे.   

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकऱ्यांनी शेतात पेरलेली तूर सध्या बाजार समितीत विक्रीला येत असून, आवक वाढताच भावात घसरण झाली आहे. शनिवारी तुरीला ६२५० रूपये प्रतिक्विंटल भाव होते तर सोमवारी यामध्ये दोनशे रूपयांनी घट झाली आहे.      गतवर्षी जून महिन्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामात तुरीची पेरणी केल्यानंतर चांगला पाऊस झाला. त्यामुळे तुरीचे पीक बहरले होते. मात्र त्यानंतर परतीचा जोरदार पाऊस झाला. तसेच परतीचा पाऊस संततधार झाला. त्यामुळे कपाशीचे बोंडे सडली. त्यानंतर बोंडअळीच्या आक्रमणामुळेही कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता तुरीचे पीक बाजार येण्याला सुरूवात झाली आहे.  मात्र, जसजशी आवक वाढत आहे, तसे भावात घसरण होत आहे. तुरीच्या दरात गत दोन दिवसात २०० रूपयांनी घसरण झाली आहे. शनिवारी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला ६२५० रूपये भाव मिळाला होता. तर सोमवारी यामध्ये घसरण होऊन ६१०० ते ५८०० रूपये भाव मिळाला. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी ७ हजार ५६९ क्विंटल तुरीची आवक झाली. तुरीची सोंगणी सुरू असून, बाजार समितीत आवक वाढत आहे. शासनाने तुरीला ६ हजार रूपये हमीभाव जाहीर केला आहे. बाजार समितीत यापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी